India

ओमियोक्रोन ची आता “ही” नवे आणि विचित्र लक्षणे..!जाणून घ्या काय आहे..!

ओमियोक्रोन ची आता “ही ” नवे आणि विचित्र लक्षणे..!जाणून घ्या काय आहे..!

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याचा नवीन प्राणघातक प्रकार ओमिक्रॉनच्या आगमनानंतर तिसऱ्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. देशात दररोज दोन लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. ओमिक्रॉनच्या लक्षणांना सौम्य असल्याचे मानले जात असले तरी आता हा प्रकार देखील डेल्टा सारखा रंग बदलत आहे. ओमिक्रॉन झपाट्याने त्याची लक्षणे बदलत आहे. आता रूग्णांमध्ये खोकला, ताप, सर्दी किंवा थकवा अशी लक्षणेच दिसत नाहीत. तर रुग्णांमध्ये काही विचित्र लक्षणे दिसू लागली आहेत, जी कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.

ओमिक्रॉनच्या सामान्य लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर बहुतेक रुग्णांना नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा (सौम्य किंवा गंभीर), शिंका येणे आणि घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसत असल्याचं समोर येत आहे. पण ओमिक्रॉन जितक्या वेगाने वाढत आहे तितकीच त्याची लक्षणेही बदलत चालली आहेत. कोरोना विषाणूच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. सध्या हिवाळा ऋतू असून या ऋतूत सर्दी-फ्लूचा धोका सर्वात जास्त असतो. कोरोनाची लक्षणे फ्लू सारखीच असल्याने ताबडतोब चाचणी करणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप याशिवाय कोणाला काही विचित्र लक्षणे जाणवत असतील तर सावध व्हा.

त्वचा..

ओमिक्रॉनचा त्वचेवर गंभीर परिणाम होत आहे. अलीकडे जे लोक ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत त्या लोकांमध्ये त्वचेशी संबंधित लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्या त्वचेवर तीन वेगवेगळ्या प्रकारचे रॅशेस आढळून आले आहेत. यामध्ये अंगावर उठणा-या पित्ताच्या गाठी, पुरळ किंवा घामोळ्या आणि हाता-पायांवर सूज यांचा समावेश आहे. या तिन्ही परिस्थितींमुळे त्वचा लाल होते आणि खाज सुटू शकते.

डोळे..

ओमिक्रॉनची लक्षणे डोळ्यांतही दिसत असल्याचं आढळून आल आहे. जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांत बुबुळाच्या आसपासच्या सफेद भागात दाह होत असेल म्हणजेच कंजंक्टिवाइटिसने ग्रस्त असेल तर त्याने स्वतःची तपासणी करून घ्यावी. हे कोरोनाचे लक्षण असू शकते. याला पिंक आइज असेही म्हणतात, ज्यामध्ये डोळ्यांत लालसरपणा, पाणी येणे आणि दुखणे यांचा समावेश आहे.

अतिसार..

विषाणूच्या कोणत्याही प्रकाराचा संसर्ग असो, अतिसार हे एक प्रमुख लक्षण आहे. ओमिक्रॉनच्या बाबतीतही हे लक्षण अनेक रुग्णांमध्ये दिसून येते. सुमारे 20% रुग्णांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्यानंतर काही वेळातच अतिसाराची लक्षणे जाणवत आहेत.

घाम..
घाम येण्याची समस्या सामान्यत: कर्करोग किंवा हृदयासारख्या इतर आजारांच्या बाबतीत दिसून येते. आता हे लक्षण ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही दिसून येत आहे. घसा दुखण्यासोबतच रात्री घाम येणे यासारख्या समस्या रुग्णांना भेडसावत आहेत.

भूक न लागणे..

कोविड ओमिक्रॉनने ग्रस्त असलेल्या तीनपैकी एका व्यक्तिला भूक लागत नाही. एवढेच नाही तर काही रुग्ण अन्नच सोडून देत आहेत. हे लक्षण 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये जास्त दिसून येते आहे. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही ताबडतोब कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button