Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी…

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी…

अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला व “तुम मुझे खून दो ! मैं तुम्हे आजादी दूंगा !या त्यांच्या घोषनेने इतिहासातील ज्वलंत प्रसंगांना उजाळा मिळाला.
यावेळी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के,
शाळेचे स्काउट शिक्षक एस. के. महाजन ,एच.ओ माळी
शिक्षकेतर कर्मचारी एन.जी देशमुख, संभाजी पाटील उपस्थित होते.
इयत्ता दहावीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button