Amalner

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील 7 आरोपींसह जवळपास साडे सहा लाखांचा  मुद्देमाल जप्त..!अमळनेर पोलिसांची उत्तम कामगिरी..!

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील 7 आरोपींसह जवळपास साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त..!अमळनेर पोलिसांची उत्तम कामगिरी..!

दि.23/09/2021 रोजी रोहन दावल वाडीले वय 35 वर्ष रा.श्रीराम नगर ढेकूरोड अमळनेर यांचे मालकिची 80,000/रू.कि.ची ट्रॅक्टर ची ट्रॉली क्र.एम.एच.18-एन.8305 हि अमळनेर शहरातील धुळे रोड लगतचा आरके ट्रेडिंग दुकान जवळुन
दि.26/08/2021 रोजी रात्री 20.00 ते दिनांक 27.08.2021 रोजी सकाळी 08.00 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने
चोरून नेली होती बाबत अमळनेर पो.स्टे.गुरनं. 396/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर
गुन्ह्याचा तपास सफौ.246 बापु मोतीलाल साळूखे हे करीत होते. सदर गुन्ह्याचा तपासात दरम्यान अमळनेर पोलीसांना सदर ट्रॉलीशी
मिळती जुळती वर्णनाची ट्रॉली फेसबुक वर विक्री साठी अपलोड केल्याची माहीती मिळाली होती अमळनेर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ,
418 सुनिल हटकर,पोना 2204 मिलींद भामरे अशांना नमुद बातमीची खात्री करणे कामी मनमाड, नांदगांव जि.नाशिक या ठिकाणी
पाठवुन त्यानंतर फेसबुक वरिल ट्रॉली ही गुन्हयातील गेल्या माला पैकीच असल्याचे खात्री झाल्याने त्यांनतर तपासी अंमलदार सफौ246 बापु सांळुखे अशांसह सदर पथकाने ट्रॉली व टॅकर चोरणारे आरोपी 1) जगन्नाथ रामदास पवार वय 21 वर्षे रा बल्लाणे ता जि धुळे ह.मु.अवधान ता जि धुळे 2) राहुल पांडुरंग भिल वय 20 वर्षे रा इंदिरानगर अवधान ता जि धुळे यांना अटक केली होती.त्यांना मा.न्यायालया समोर हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर गुन्हयातील आरोपी 3) उत्तम भास्कर पाटील वय 44 वर्षे रा अवधान ता जि धुळे व सदर ट्रॉली व टॅकर ची विल्हेवाट लावणारे मालेगांव येथील स्क्रॅप व्यवसायीक 4) शकिल खाँन खलीलखान वय 30 वर्षे रा अन्सार कॉलनी पंचतंत्र चौक मालेगाव 5) अमिन शेख अब्दुल्ला शेख वय 24 वर्षे रा गणेश नगर मालेगाव अशांना अटक करुन आतापावेतो गुन्हयाच्या गेल्यामालातील 40,000/-रु.कि.चा.ट्रॉलीचा सांगाडा हस्तगत केला
असुन त्यासोबतच खालील प्रमाणे चोरलेला मुद्देमाल हस्तंगत करण्यात आला आहे.
१) 80,000/- रुपये किंमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली क्रमांक एम एच 18 ए 8305,
2) 35,000/- रुपये किंमतीचे निळ्या रंगाचे टँकर अमळनेर पो.स्टे गुरन 398/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे मधील,
3) 50,000/- रुपये किंमतीचे भुरकट रंगाचे टँकर अमळनेर प्रवेशद्वार येथील चोरलेले
4) 40,000/- रुपये किंमतीचे एक टैंकर कटरने कापुन तुकडे केलेले धुळे शहरातील चोरलेले असे चोरून नेलेला माल
5)3,25,000/-रू.कि.चे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर,
6)60,000/-रू.कि मो.सा.क्र. एम.एच.18.बी.टी. 4008 होंडा शाईन कंपनीची ,
7) 50000/-रू. कि.मो.सा.क्र.एम.एच.18 ए.यु.9717 टी.व्ही.एस कंपनीची
असा एकूण 5,25,000/- कि.चा मुद्धेमाल हस्तगत करून आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास सफौ-246 बापु सांळुखे हे करित असुन गुन्हयाचा तपासकामी पोना-2204 मिलींद भामरे ,पोहेकॉ-418 सुनिल हटकर हे मदत करित आहेत.

गुन्हा क्रं.2 श्री.सुरेश रामलाल भिल रा.धानोरा ता.अमळनेर हे ऊस तोडणी कामगार पुरवण्याचे मुकादम म्हणुन काम करत असून त्यांना दि.25/09/2021 रोजी 08.30 वाजेचा सुमारास फिरोज राजु पवार यांने फोर करुन सांगितले की,माझा कडे
सतरा कोयते असलेले मजुर दहिवद येथे आहेत. त्यावरुन फिर्यादी सुरेश भिल यांचे दोन नातेवाईकासह दहिवद ता.अमळनेर येथे गेले असता दुपारी 01.15 वाजेचा सुमारास फिरोज पवार यांने त्याचे सोबतचे इतर १४ साथीदाराना ऊसतोड कामगार आहेत असे दाखविले त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांचे खिशातील 1,05,000/-रु.रोख मारहाण करत जबरीने हिसकावुन घेतले व 15,000/-रु.कि.चे दोन मोबाईल हँन्डसेट जबरीने काढुन घेत चाकुने मारण्याची धमकी दिली होती यावरुन श्री.सुरेश रामलालभिल यांनी फिर्याद दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरंन.400/2021 भादवि कलम 395 प्रमाणे दि.26/09/2021
रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोनि श्री.जयपाल हिरे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोउपनिरी.शत्रुघ्न पाटील हे करित असुन त्यांनी पोना-2973 दिपक माळी ,पोकॉ-3331 रविंद्र पाटील,पोकॉ-537 अमोल पाटील अशा पथकासह फागणे येथे जावुन गुन्हयातील आरोपी नामे.फिरोज राजु पवार व रोहन गुलाब मोरे दोन्ही रा.फागणे ता.जि.धुळे यांना मोठया शिताफिने अटक केली आहे.दोन्ही आरोपीतांनी गुन्हयाची कबुली दिली असुन उर्वरित आरोपीतांना गुन्हयात लवकरच अटक करण्यात येणार आहे.
वरिल दोन्ही गुन्हे अमळनेर पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मा.श्री.डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव मा.श्री.रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधिक्षक मा.श्री.रुषिकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली उघडकीस आणले आहेत.
या शिवाय ट्राली व टॅकर चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button