Amalner

गॅस वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी चे आंदोलन

गॅस वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी चे आंदोलन

अमळनेर : आज दिनांक २१/०८/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंधन दरवाढीचा निषेध नोंदवून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. तसेच महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रसरकारच्या विरोधात महागाई नमस्कार आंदोलन
गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल दरवाढ विरोधात.
भाजपा सरकार केंद्रात आल्यापासुन ते
आजतागायत सामान्य माणसावर फक्त अन्यायच करत आली आहे. तेलाचे भाव असो की दाळीचे भाव
असो फक्त वाढ कशी होईल हेच केंद्र सरकार पहात आहे. आणि आता त्यात भरीस भर म्हणुन
सिलेंडरचे भाव २५रु.वाढवले आहेत.
महोदय आधीच या कोरोना महामारीच्या काळात लॉकडॉऊन मुळे सामान्य जनतेचे कंबरडे
पुरते मोडले आहे. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या काम धंधे ठप्प झालेले. परंतु हे सर्व १० लाखाचा
सुट घालुन फिणाऱ्या आपल्या प्रधानमंत्री साहेबांना दिसत नाही. आज एका गरीब व्यक्तीला एकवेळ
जेवणाची भ्रांत आहे. परंतु यांना फक्त आपल्या तिजोऱ्या भरायच्या आहेत. त्यात सामान्य माणुस कसा
भरडला जातोय याची त्यांना मुळीच चिंता नाही. सामान्य माणसाने जगाव तरी कसे?
आज प्रत्येकाला आपल्या येणाऱ्या दिवसाची चिंता असते. या भाजपासरकारने सामान्य
माणसाला महगाईच्या विळख्यात इतका अडकवला आहे की तो विरोधासाठी वेळ काढू शकत नाही. ही
शोकांतीका आहे. दररोज होणारी भाववाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही आहे.
तरी महारायांना नम्र विनंती की ही भाववाढ मागे घेण्याची शिफारस आपण आपल्या
स्तरावरुन करावी.
है.म.जा होय.
निवेदनावर पुढील मान्यवरांच्या सह्या होत्या.
मा. सौ. जयश्रीताई पाटील, जि प सदस्य जळगाव.
सौ.रिता भूपेंद्र बाविस्कर, ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक.
सौ. रंजना प्रवीण देशमुख, प्रदेश सरचिटणीस,
सौ. योजना जितेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस.
सौ. आशा चावरिया, जिल्हा सचिव.
सौ. मंदाकिनी अनिल पाटील, तालुका अध्यक्ष.
सौ. अलका उत्कर्ष पवार, शहर अध्यक्ष.
सौ.आशा अनिल शिंदे, तालुका कार्याध्यक्ष.
सौ. भारती महेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष.
सौ. वैशाली शिवकुमार ससाणे, शहर उपाध्यक्ष.
कु.जलशालीनी प्रकाश महाजन, शहर उपाध्यक्ष.
सन्मानित पुरुष पदाधिकारी
श्री. मुख्तार दादा खाटीक,शहर अध्यक्ष, श्री. विश्वास पाटील, श्री.गुणवंत पाटील, श्री.रणजित नाना,श्री.गोविंद दादा, श्री.प्रकाश महाजन. व इतर पदाधिकारी..

संबंधित लेख

Back to top button