Nashik

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन* कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन* कारवाई करण्याची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=खा. शरद पवार साहेब यांच्या विषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसलेच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले यानी बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यासह चांदवड तालुक्यात उमटले आहेत.

तुषार भोसले हा इसम सातत्याने डिजीटल माध्यमांवर चर्चेत राहण्यासाठी सातत्याने आपल्या कुवतीपेक्षा अधिक व आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो.पण ह्यामुळे सामाजिक सलोखा व शांतता बिघडून समाजात तेढ निर्माण होते अश्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास नाईलाजाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष त्यांच्या पद्धतीने धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

आमचे दैवत श्री शरद पवार साहेब यांचे बाबत आक्षेपार्य व बदनामीकारक विधान केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चांदवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांचेकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी दत्तात्रय वाकचौरे ,अॅड.नवनाथ आहेर(नगरसेवक), विक्रम जगताप, विजय नाना गांगुर्डे (पैलवान) गजानन पगारे, हरिभाऊ निकम, रिजवान घाशी, रौनक कबाडे, रमेश वाकचौरे यांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button