राष्ट्रवादी महिला ओबीसी सेलच्या वतीने वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी
रफिक अत्तार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे भाजप नेत्या पंकजा ताई मुंडे यांची व त्यांच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदमसाहेब यांच्याकडे महिला राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत यांनी निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
त्यावेळी युवती जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले जिल्हा कार्याध्यक्षा रंजना हजारे ओबीसी सेलच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष कविता जाधव शहराध्यक्ष संगिता माने शहर कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अमृता शेळके युवती शहराध्यक्ष हर्षाली परचंडराव उपाध्यक्ष ऋतुजा चव्हाण श्वेता देशपांडे सारिका होनमाने सौउमा सुतार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या