Pandharpur

2024 ला राष्ट्रवादी कॉंग्रेस नक्कीच भरारी घेईल- डॉ.प्रणिता भालके पंढरपुरात साहेब करंडक 2021 कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन

2024 ला राष्ट्रवादी कॉंग्रेस नक्कीच भरारी घेईल- डॉ.प्रणिता भालके
पंढरपुरात साहेब करंडक 2021 कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना ही श्रीकांत शिंदे हा कार्यकर्ता शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरात 6 दिवस कार्यक्रम घेत होता. तो केवळ पक्ष जीवंत आहे हे दाखवून देत होता. नेत्यांसाठी जीवाचे रान करणारा कार्यकर्ता असला की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा नक्कीच 2024 ला भरारी घेईल असे गौरवोद्‌गार डॉ.सौ.प्रणिता भगिरथ भालके यांनी काढले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या
वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला व पुरूष खुला गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे दि.15 डिसेंबर 2021 रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक स्टेशन रोड येथे दिमाखात उद्‌घाटन डॉ.प्रणिता भालके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
या स्पर्धेत 450 पुरूष खेळाडू व 120 महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. यातून महाराष्ट्र कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे ,साईनाथभाऊ अभंगराव, गटनेते सुधीर धोत्रे, कॉंग्रेस शहराध्यक्ष राजेश भादुले, संजय अभ्यंकर, श्रेया भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्‌घाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी किरण घाडगे, पश्चिम महाराष्ट्र नेते अरूणभाऊ कोळी, राहुल साबळे, अनिल अभंगराव, धनंजय कोताळकर, महमंद उस्ताद,संजय ननवरे, सुधीर भोसले, विजय देशमुख संदीप मांडवे,नगरसेवक प्रशांत शिंदे, सतीश शिंदे, प्रशांत मलपे, युवराज पाटील, मंगळवेढा नगरसेवक अजित जगताप, संतोष नेहतराव, मारूती जाधव,, शहराध्यक्ष स्वप्निल जगताप , साधना राऊत, शुभांगी जाधव, सागर कदम, सुरज पावले, दादा थिटे, संतोषआण्णा बंडगर, तानाजी मोरे,उपस्थित होते.
तसेच शुक्रवार दि.17 रोजी बक्षिस वितरण व जुन्या कब्बडी खेळाडूंचा सत्कार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील , माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते
करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button