Bollywood

Bollywood Stories: राम तेरी गंगा मैली फेम मंदाकिनीवर तिच्या वडिलांनीच झाडली गोळी…!

Bollywood Stories: राम तेरी गंगा मैली फेम मंदाकिनीवर तिच्या वडिलांनीच झाडली गोळी…!

मुंबई अभिनेते दिग्दर्शक राज कपूर यांनी अभिनेत्री मंदाकिनीला बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच केलं होतं. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूरसोबत तिने स्क्रीन शेअर केला होता. बऱ्याच वर्षांनंतर ती छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि संगीता बिजलानी यांनीसुद्धा हजेरी लावली होती. या शोमध्ये मंदाकिनी तिच्या करिअरपासून खासगी आयुष्यापर्यंतच्या विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाली.

‘राम तेरी गंगा मैली’नंतर चित्रपट का केले नाहीत?

‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी त्याकाळी तुफान गाजल्या होत्या. या चित्रपटातील भूमिकेसाठी मंदाकिनीला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नामांकनदेखील मिळालं होतं. या चित्रपटातील मंदाकिनीचे बोल्ड सीन्स त्यावेळी खूप चर्चेत होते. मात्र त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायबच झाली. याविषयी कॉमेडियन कपिल शर्माने प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मला त्या चित्रपटानंतर बऱ्याच चांगल्या चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. काही चित्रपट मी साईनसुद्धा केले होते. एका चित्रपटासाठी मी पहिले 10 दिवस शूटिंग केलं होतं आणि त्यानंतर त्याचा दिग्दर्शक अचानक गायब झाला. तो परतलाच नाही. सुदैवाने मी काही रक्कम ॲडव्हान्स स्वीकारली होती.”

वडिलांनीच झाडली होती का गोळी?

या शोमध्ये मंदाकिनी तिच्याबाबतच्या एका अफवेबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. वडिलांनी मंदाकिनीला गोळी झाडल्याच चर्चा त्याकाळी होती. असं खरंच घडलं होतं का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी मला गोळी झाडल्याची चर्चा होती. जेव्हा मी सेटवर पोहोचले होते, तेव्हा प्रत्येकजण माझ्याकडे धावून आला. मी ठीक आहे का, असे प्रश्न ते मला विचारू लागले होते. त्यांना माझी काळजी का वाटत होती, असा प्रश्न मला पडला होता. नंतर मला गोळी झाडल्याच्या अफवेविषयी समजलं होतं.”

पतीला हिंदी भाषा येत नव्हती

मंदाकिनीने डॉ. कग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्याशी जेव्हा मंदाकिनी पहिल्यांदा भेटली, तेव्हा त्यांना हिंदी भाषासुद्धा येत नसल्याचं तिने सांगितलं. “माझी आई हिमाचलची होती आणि त्यामुळे आम्ही तिथे अनेकदा जायचो. तिथेच मी माझ्या पतीला भेटले आणि आम्ही लग्न केलं. जेव्हा आमची पहिली भेट झाली होती, तेव्हा त्यांना हिंदी भाषा येत नव्हती. त्यावेळी मी त्यांच्या आईशी बोलायचे आणि त्या त्यांना भाषांतर करून सांगायच्या. नंतर लग्नापर्यंत ते हिंदी बोलायला शिकले होते”, असं मंदाकिनीने सांगितलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button