Navi Mumbai

नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अभंग शिंदे यांची निवड

नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अभंग शिंदे यांची निवड

राजेश सोनुने

नवी मुंबई प्रतिनिधी:- नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.अभंग व्यंकटराव शिंदे यांची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड लोकनेते आमदार श्री.गणेशजी नाईक साहेब यांच्या आशिर्वादाने तसेच नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.दिनेशजी पारख यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते श्री.गणेशजी नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अभंग शिंदे यांची निवडयावेळी नवनिर्वाचित शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले नवी मुबंई रेल्वे प्रवासी संघाचे काम आपण सक्षम पणे पार पाडू . नवी मुंबईतील नागिरकांचे रेल्वे संबंधी प्रश्न आपण संघाच्या माध्यमातून सोडवू ,व जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडवण्यात येतील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
यावेळी उपस्थित योगेश शिंदे ,राहुल गोपले ,अण्णाराव लोकरे ,बालाजी जाधव आदीसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button