Amalner

नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

नात्यांचे सर्व्हिसिंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

अमळनेर महाविद्यालयीन जीवनात पु ल देशपांडे, शिवाजी सावंत,तात्यासाहेब शिरवाडकर यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या वांड्मयीन चर्चा व सहवासातून मन संस्कारित झाल्यानेच ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रह लिहिण्याचे धाडस मी करू शकलो!’ असे प्रतिपादन लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांनी “नात्यांचे सर्विसिंग” या कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्यात अमळनेरच्या रोटरी हॉल येथे केले.
‘ माझ्या लिखानाला मधू मंगेश कर्णिक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी दिलेला प्रतिसाद मला बळ देऊन गेला तर शब्द मल्हार प्रकाशनाचे संपादक स्वानंद बेदरकर व माझे मित्र विनायक रानडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा कथासंग्रह प्रत्यक्ष वाचकांपर्यंत पोचवता आला. दोन आवृत्या संपून तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन साने गुरुजींच्या सानिध्याने पावन झालेल्या अमळनेर नगरीत होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले. अमळनेर येथील मराठी साहित्य परिषद ,साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि मराठी वांड;मय मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आयोजित नात्यांच्या सर्विसिंग या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य
प्राचार्य तानसेन जगताप यांनी कथासंग्रहातील विविध कथांचा आढावा घेत ठाकूर यांनी आपले अनुभव रसिकांसमोर मांडणे सतत सुरू ठेवावे असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनी ठाकुरांचा कथासंग्रह अत्यंत वाचनीय असून आपले अनुभव मांडण्याची हातोटी ठाकूर यांच्याकडे आहे त्यांनी आपल्या समग्र आयुष्यातील अनुभव यापुढे मांडावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आबा महाजन यांचा विशेष सत्कार गौरवचिन्ह देऊन करण्यात आला. ‘विश्वास ठाकूर यांनी लिहिलेल्या कथा म्हणजे बँकिंग क्षेत्रात काम करीत असताना त्यांना आलेले अनुभव व त्या माध्यमातून ते रसिकांना देत असलेली अनुभूती याचा दिव्य संगम असल्याचे महत्त्व शब्द मल्हार चे स्वानंद बेदरकर यांनी मांडले.याप्रसंगी जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील व अहिराणी साहित्यिक तहसिलदार सुदाम महाजन यांनी नाते रुजविणे आणि टिकविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत आपल्या खुमासदार शैलीने रसिकांची मने जिंकून घेतली. आकाशवाणी केंद्र संचालक अनिरुद्ध कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विचारपीठावर म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी रमेश पवार, साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, समिती सदस्य वेदांशू पाटील, संदिप घोरपडे, रणजित शिंदे,प्रा लिलाधर पाटील,प्रकाश वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा उद्योजक लेखक व संयोजन समितीचे सदस्य वेदांशू पाटील यांनी केले तर समिती सदस्य संदीप घोरपडे यांनी मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा पट स्वागतपर मनोगतात व्यक्त केला.प्रा लिलाधर पाटील यांनी,विश्वास ठाकूर हे सहकार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व असल्याचा उल्लेख करून फोर्ब्स इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, द इकॉनॉमिक्स टाइम्स, फॉर्च्यून इंडिया यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मीडियाने विश्वास ठाकूर यांची घेतलेली दखल तसेच दिव्य मराठी, दैनिक सकाळ ,द इकॉनॉमिक्स टाइम्स या सारख्या समूहांनी त्यांना दिलेले विविध पुरस्कार यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून विश्वास ठाकूर यांच्या कर्तुत्वाचा पट रसिकांसमोर मांडला.

लॉक डाऊन नंतर साहित्यिकांच्या गप्पांची मेजवानी अमळनेरकरांना मिळाल्याबद्दल मान्यवरांचे आभार संयोजन समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी व्यक्त केले.अर्बन बँक संचालिका सौ.वसुंधरा लांडगे यांनी गायलेल्या साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने समारंभाची सुरुवात तर समारोप पसायदानाने झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास बँकेचे अतुल खैरनार,जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमा पाटील, मुन्ना शेख, अंबिका टेंट चे संचालक कैलास पाटिल,युवा कार्यकर्ते निलेश वाघ,अमोल संदानशिव, हितेश बडगुजर , राहुल पाटील,चिन्मय पाटील,प्रतिक जैन रोटरी क्लब,ठाकूर समाज मंडळ यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button