Pandharpur

फॅबटेक इंजिनियरिंग कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न

फॅबटेक इंजिनियरिंग कॉलेज मध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला: येथील फॅबटेक इंजिनियरिंग कॉलेज मध्ये 25 जानेवारी रोजी असणारा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात पार पडल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली.
या वेळी ,नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे व त्या संदर्भात विद्यार्थ्या मध्ये जागृती निर्माण करणे हा राष्ट्रीय मतदार दिनाचा हेतू असल्याचे नोडल अधिकारी प्रा.जीवन पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली या वेळी इंजिनीयरिंग चे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे, अकॅडमीक डीन प्रा.तात्यासाहेब जगताप,विद्यार्थीप्रमुख प्रणव चंदनशिवे, सर्व विभागप्रमुख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button