Pune

शिवसेनेत प्रवेश करणार का? हर्षवर्धन पाटील यांनी केला खुलासा

शिवसेनेत प्रवेश करणार का?
हर्षवर्धन पाटील यांनी केला खुलासा

मुंबईमध्ये सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात ही चर्चा झाली

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे | माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पाटील हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळास सुरू झाली होती. मात्र आता हर्षवर्धन पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीविषयी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ही भेट केवळ साखर उद्योगा संदर्भात होती. मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी भाजपातच राहुन काम करणार आहे. या केवळ अफवा आहेत असे स्पष्ट करीत हर्षवर्धन पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईमध्ये सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात ही चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला सुरवात झाली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button