Nashik

प्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे .

प्रस्थापित पक्षांच्या नादी न लागता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार -अण्णासाहेब कटारे

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक= राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्हा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा हॉटेल शिवनेरी ,वाडा रोड, अस्नोली व्हिलेज ,भिवंडी ठाणे येथे
राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
मेळाव्यास मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की येथील प्रस्थापीत व्यवस्थेने गरीब घटकांचा आवाज कधीही बुलंद होऊ दिला नाही, नेहमीच जाती/पातीचे /धर्माचे राजकारण करून येथील उपेक्षित/ वंचित /गरीब घटकांना दुर्लक्षित ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
देशातील /राज्यातील प्रस्थापित पक्षांनी देखील कधी या घटकांकडे सकारात्मकतेने पाहिले नाही केवळ आपल्या सत्तेसाठी या निर्णायक असलेल्या गरीब घटकांचे मते (हायजॅक)
पळविण्याचे काम केले आहे. गरिबांना/ वंचितांना सत्तेत सहभाग न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक-सामाजिक -शैक्षणिक व राजकीय प्रगती देखील होऊ शकली नाही.हे सत्य लपून राहिले नाही म्हणूनच
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने
आम्ही रिपब्लिकन” हे समाज जोडो अभियान संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आहे व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाज घटकातील सर्वच घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत असल्याने आता प्रस्थापित पक्षाच्या नादी न लागता आपली स्वतंत्र ताकद आजमविण्याचा निर्णय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने घेतलाअसून ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका/ नगरपालिका/ जिल्हा परिषद /पंचायत समिती /आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वच सार्वत्रिक निवडणुका लढविण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.
मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गिरीषजी अकोलकर , कोकण प्रदेशाध्यक्ष प्रदीपजी रोकडे, युवा नेते बिपिन भाई कटारे,मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ नागरे,प्रशांत कटारे उपस्थित होते.
मेळाव्याचे नियोजन ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड.दिनेश जी ठाकरे यांनी केले होते.
वाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले,
पेट्रोल/डिझेल/गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत महागाईमुळे देशातील सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला असून त्याकडे केंद्रशासन /राज्य सरकार ढुंकूनही पाहावयास तयार नाही.अत्यंत दयनीय अवस्थेत येथील गरीब घटक आपले जीवन कंठीत आहे.
दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढत्या किंमती ने तर सामान्य माणूस हतबल झाला आहे शासनाकडून त्यांना कुठलाही दिलासा आधार दिला जात नाही.
बेरोजगारी ने डोके वर काढले असून अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत, त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागले आहे ही अत्यंत भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने भरमसाठ वाढलेली महागाई कमी करून देशातील जनतेला दिलासा द्यावा असे आवाहनही अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना केले आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात ठाणे जिल्ह्यात अत्यंत जोमाने वेगाने सुरू असून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्हा हा लवकरच बालेकिल्ला ठरल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास देखील त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
मेळाव्याप्रसंगी
ठाणे शहर संघटक सचिव गणेश ठाकरे,जेष्ठ नेते भारत कारंडे,बदलापूर शहराध्यक्ष कैलास जाधव,भिवंडी तालुका अध्यक्ष किशोर पाटील,उपाध्यक्ष सचिन माने,वाडा तालुका अध्यक्ष जयंत पाटील,मुंब्रा शहराध्यक्ष सुधाकर साळवी,अंबरनाथ तालुका अध्यक्ष अजय काळिंबे,कल्याण शहराध्यक्ष युवा बापूजी ढालवाले, उपाध्यक्ष प्रशांत हेलोडे,डोंबिवली अध्यक्ष प्रवीण बेटकर,दिवा शहराध्यक्ष रमेश भाई तुपे,ठाणे शहर अध्यक्ष संजय गुप्ता,भिवंडी ता.संजय सुतार,शहापुर तालुका अध्यक्ष ऍड.गुलाब खंदारे,वाडा तालुका उपाध्यक्ष कैलास पाटील,भिवंडी तालुका उपाध्यक्ष युवा विजय भोईर,अंबरनाथ शहराध्यक्ष नूर मोहम्मद खान,बदलापूर युवा नेते रुतीकेश रोकडे,जेष्ठ नेते सुदेश पाटील,राहुल उघडे,दीपक साळवे,संतोष जाधव,योगेश जाधव, विठ्ठल माझें, संजय पाटील,दीपक हिरे अंबाडी,सिद्धांत गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button