Amarawati

राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

विक्की खोकरे

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील स्थानिक आदर्श महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग , अंतर्गत गुणवत्ता हमी सेल तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , रजी ४८९ / २०१७ / महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये देशातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून स्पर्धकांनी प्रतिसाद नोंदिवला . या स्पर्धे मध्ये निकिता जाधव प्रथम , गौरी जया द्वितीय , नामागिरी वेंकटेसन यांनी तृतीय पारितोषिक पटकावले . त्याचप्रमाणे नूतन लवनकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले . विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात आपल्या कलेला वाव देऊन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आदर्श महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते . स्पर्धेचे परीक्षण प्राणीशास्त्र विभागातर्फे करण्यात आले . सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठवण्यात आले .

आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे चे प्राचार्य डॉ. योगेंद्र गांडोळे , प्राणीशास्त्र विभागाचे डॉ . सय्यद ओबैद कुरेशी , सहाय्यक प्रा. सूर्यवंशी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा सचिव हे आयोजन समितीचे प्रमुख होते . प्राणीशास्त्र विभाग आदर्श महाविद्याल यातील विद्यार्थी अनुश्री नागपुरे , रचना शर्मा , ओवेस मुगल , हिमांशू शेंडे तसेच अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या आयोजना करीता आपले योगदान दिले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button