Nashik

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती ना.डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत साजरी

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

आयुर्वेद सेवा संघ संचलित गणेशवाडी नाशिक येथील आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. आयुर्वेद दिवस हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होतो मंत्रोच्चारात ना.डॉ.भारती पवार यांनी दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन केले. याप्रसंगी भाजप पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता लक्ष्मणजी सावजी हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी ना.डॉ.भारती पवार यांनी सांगितले कि, भारताने जगाला दिलेल्या संपन्न वसांच्या ठेवींमध्ये आयुर्वेद हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. वेदांमधील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.
या दिवसाच्या निमित्ताने आयुर्वेद आणि त्यामधील विविध उपचार पद्धतींबाबत जनजागृती करण्याचं काम केले जाते. कोरोना संकटाच्या सामन्यामध्ये आयुर्वेदाची मदत घेतली गेली .
भारतामध्ये 2016 पासून केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दिवाळीतील धन्वंतरी जयंतीचा दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षी त्याचा उत्साह एका विशिष्ट थीमवर केलं जातं. दरम्यान धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता असल्याने तिचं पूजन करण्याची देखील प्रथा आहे. भारतामधून अजूनही कोरोना विषाणू हद्दपार झालेला नाही. त्याचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यास काही प्रमाणात यश आलं आहे. मात्र संकट टळलेलं नसल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
तसेच आयुर्वेद महाविद्यालयाच्या कामकाजाची प्रशंसा केली तसेच आजचा दिवस हा आरोग्य दिन म्हणून साजरा होतो म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे मानवी जीवनातील सर्वात मोठे धन म्हणून आरोग्य हेच असून ज्याचे आयुष्य निरोगी आहे तोच मनुष्य जगातील सर्वात धनवान व्यक्ती आहे. निरोगी आयुष्य हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.
धनत्रयोदशी धन्वंतरी पूजनाने हा दिवस साजरा झाला पाहिजे माननीय पंतप्रधान मोदीजींचा संकल्प आहे की आयुर्वेदाला जगभरात स्थान मिळाले पाहिजे त्याकरीता वेगळे आयुष्य मंत्रालय त्यांनी काढले. नऊ महिन्यात शंभर कोटींचे लसीकरण करून भारताने नवीन विक्रम प्रस्थापित केला ही आपल्याला गौरवाची बाब आहे. या काळात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्याचे काम मोदींच्या नेतृत्वात उभे राहिले पारंपरिक आयुर्वेदाचे महत्त्व खूप आहे या संस्थेला 97 वर्ष पूर्ण झाले आहेत हे महत्त्वाचे आहे
नाशिकच्या या भौगोलिक वातावरणात आयुर्वेदिक बहरू शकतो. येणाऱ्या काळात सण साजरे करा..! सोबत आरोग्याची विशेष काळजी घ्या..! सुरक्षित अंतर ठेवा..! धन्वंतरी देवी सर्वांना कोरोना संकटातून मुक्त करो..! सर्वांना निरोगी आयुष्य लाभो असे ना.डॉ.भारती पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी मा.श्री.लक्ष्मणराव सावजी प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष डॉ.अंबादास कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.आशुतोष यार्दी, सचिव डॉ.अभय कुलकर्णी, सहसचिव डॉ.रजनी गोखले, खजिनदार डॉ.माधव परांजपे व आदी आयुर्वेद सेवा संघ नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती ना.डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत साजरी

आयुर्वेद सेवा संघ संचलित गणेशवाडी नाशिक येथील आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. आयुर्वेद दिवस हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होतो मंत्रोच्चारात ना.डॉ.भारती पवार यांनी दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन केले. याप्रसंगी भाजप पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता लक्ष्मणजी सावजी हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी ना.डॉ.भारती पवार यांनी सांगितले कि, भारताने जगाला दिलेल्या संपन्न वसांच्या ठेवींमध्ये आयुर्वेद हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. वेदांमधील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.
या दिवसाच्या निमित्ताने आयुर्वेद आणि त्यामधील विविध उपचार पद्धतींबाबत जनजागृती करण्याचं काम केले जाते. कोरोना संकटाच्या सामन्यामध्ये आयुर्वेदाची मदत घेतली गेली .
भारतामध्ये 2016 पासून केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दिवाळीतील धन्वंतरी जयंतीचा दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षी त्याचा उत्साह एका विशिष्ट थीमवर केलं जातं. दरम्यान धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता असल्याने तिचं पूजन करण्याची देखील प्रथा आहे. भारतामधून अजूनही कोरोना विषाणू हद्दपार झालेला नाही. त्याचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यास काही प्रमाणात यश आलं आहे. मात्र संकट टळलेलं नसल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
तसेच आयुर्वेद महाविद्यालयाच्या कामकाजाची प्रशंसा केली तसेच आजचा दिवस हा आरोग्य दिन म्हणून साजरा होतो म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे मानवी जीवनातील सर्वात मोठे धन म्हणून आरोग्य हेच असून ज्याचे आयुष्य निरोगी आहे तोच मनुष्य जगातील सर्वात धनवान व्यक्ती आहे. निरोगी आयुष्य हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.
धनत्रयोदशी धन्वंतरी पूजनाने हा दिवस साजरा झाला पाहिजे माननीय पंतप्रधान मोदीजींचा संकल्प आहे की आयुर्वेदाला जगभरात स्थान मिळाले पाहिजे त्याकरीता वेगळे आयुष्य मंत्रालय त्यांनी काढले. नऊ महिन्यात शंभर कोटींचे लसीकरण करून भारताने नवीन विक्रम प्रस्थापित केला ही आपल्याला गौरवाची बाब आहे. या काळात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्याचे काम मोदींच्या नेतृत्वात उभे राहिले पारंपरिक आयुर्वेदाचे महत्त्व खूप आहे या संस्थेला 97 वर्ष पूर्ण झाले आहेत हे महत्त्वाचे आहे
नाशिकच्या या भौगोलिक वातावरणात आयुर्वेदिक बहरू शकतो. येणाऱ्या काळात सण साजरे करा..! सोबत आरोग्याची विशेष काळजी घ्या..! सुरक्षित अंतर ठेवा..! धन्वंतरी देवी सर्वांना कोरोना संकटातून मुक्त करो..! सर्वांना निरोगी आयुष्य लाभो असे ना.डॉ.भारती पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी मा.श्री.लक्ष्मणराव सावजी प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष डॉ.अंबादास कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.आशुतोष यार्दी, सचिव डॉ.अभय कुलकर्णी, सहसचिव डॉ.रजनी गोखले, खजिनदार डॉ.माधव परांजपे व आदी आयुर्वेद सेवा संघ नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button