Jalgaon

नाथा भाऊंचा महाजनांवर पलटवार..!नाथाभाऊ सर्वांना भारी..!बीएचचारचे उतारे आहेत..!

नाथा भाऊंचा महाजनांवर पलटवार..!नाथाभाऊ सर्वांना भारी..!बीएचचारचे उतारे आहेत..!

माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजन असल्याचे आपल्याला समजले असल्याचा आरोप भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलतांना केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खडसे व महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री खडसे यांनी हा नवीन आरोप महाजन यांच्यावर केला आहे. भाजपमधील नेत्यांनी आपले असे हाल केले असून तुम्ही त्यांची हाजीहाजी कशी काय करता तुम्ही राष्ट्रवादी पक्षात या असे आवाहन देखील त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

नाथाभाऊंना सर्वत्र बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु असून हा नाथाभाऊ सर्वांना भारी आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. आपण कमावलेली संपत्ती जर बेहिशेबी असेल तर मी दान करेन. बीएचआर घोटाळ्यातून दहा कोटीची जमीन खरेदी करणा-यांचे सात बाराचे उतारे आपल्याकडे असल्याचे देखील खडसे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button