Nashik

नाशिकचे दबंग पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या कार्याला रेखचित्रातून मानाचा मुजरा-

नाशिकचे दबंग पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या कार्याला रेखचित्रातून मानाचा मुजरा-

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे कैवारी व जनतेसाठी दबंग पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना प्रसिद्ध चित्रकार मविप्र संस्थेचे महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक डॉ राजीव देशमुख यांनी स्केच काढून शेतकरी व जनतेच्या वतीने त्यांच्या कार्याला स्केच भेट देत मानाचा मुजरा केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळवून दिले . द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला खरेदी करणारे व्यापारी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणुक करत होते.याबाबत सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत कठोर निर्णय घेतले व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून रक्कम मिळवून दिली आहे चालू हंगामासाठी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये व्यवहार होताना शेतात व्यवहार होत असेल तर सौदा पावती केल्याशिवाय व सौदा पावती व दोन साक्षीदार असल्याशिवाय व्यवहार करू नये अशा पद्धतीचं कामकाज सुरू केली असून सौदा पावती संदर्भात जनजागृती सुरू केली आहे. यामुळे चांगला दरारा निर्माण झाल्याने सचिन पाटील हे शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनले आहे. पोलीस दलातही सूष्म नियोजन करून कामकाज करत असल्याने अनेक गुन्ह्याची उकल होत आहे.
सचिन पाटील यांच्या या कार्याबद्दल प्रसिद्ध चित्रकार डॉ राजीव देशमुख यांनी त्यांचा स्केच तयार करून त्याना भेट दिला.
यावेळी डॉ राजीव देशमुख, पत्रकार संतोष कथार आदी उपस्थित होते.
डॉ राजीव देशमुख यांच्या या कलेचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भरभरून कौतुक केले आहे.व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी सचिन पाटील यांनी डॉ राजीव देशमुख यांच्या कलेबद्दल आपुलकीने माहिती घेत चर्चा केली.तसेच पत्रकार संतोष कथार यांच्याशी दिंडोरी तालुक्यातील शेतकरी व विविध विषयांवर चर्चा करून माहिती घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button