Nashik

नाशिक जिल्हा परिषद १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३२ नवीन रुग्णवाहिका

नाशिक जिल्हा परिषद १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३२ नवीन रुग्णवाहिका

येवला तालुक्यातील राजापूर, भारम व सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका; मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक- कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांची असलेली कमतरता बघता ग्रामीण भागातील रुग्णसेवेच्या हेतून नाशिक जिल्हा परिषदेच्या १४ वित्त आयोग व्याजाच्या निधीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण ३२ रुग्णवाहिका घेण्यात आलेल्या आहे. यातील राजापूर, भारम व सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन रुग्णवाहिकांचे वितरण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, भाऊसाहेब भवर, दिपक लोणारी, ज्ञानेश्वर शेवाळे,गटविकास अधिकारी अन्सार शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल नेहेते,सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील देसाई, राजापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या १४ वित्त आयोग व्याजाच्या निधीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण ३२ रुग्णवाहिका वितरित करण्यात आलेल्या आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील बोरगाव , बुबळी, नाशिक तालुक्यातील जातेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड, इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे, पेठ तालुक्यातील कोहर, दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव , तळेगाव दि. वरखेडा, कळवण तालुक्यातील ति-हळ, निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे, सिन्नर तालुक्यातील दापुर , देवपुर , वावी, देवळा तालुक्यातील लोहणेर , खामखेडा, सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव , जायखेडा , निरपुर , (साल्हेर), मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण , रावळगाव , निमगाव , वडनेर खकुर्डी चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही , उसवाड, नांदगाव तालुक्यातील वेहळगाव,हिसवळ,पिंपरखेड तर येवला तालुक्यातील भारम , राजापुर ,सावरगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button