Nashik

अखेर बदली रद्द नाशिक करांच्या प्रयत्नांना यश,नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला न्यायालयाकडून स्थगिती ,

अखेर बदली रद्द नाशिक करांच्या प्रयत्नांना यश,नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला न्यायालयाकडून स्थगिती ,

शांताराम दुनबळे नाशिक

नासिक : नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदी बदली करण्यात आली होती पण त्यांच्या बदलीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे डिसेंबरअखेर बदली बाबत निर्णय घेऊ नये असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे कार्यकाळ पूर्ण झाला नसताना आमदाराच्या च्या पत्रावर बदली केल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप हे नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार होते पण त्या अगोदर स्थगिती आली आहे राज्यातील 32 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यात पाटील यांचा समावेश होता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक धडाकेबाज कारवाया सुरू केल्या त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला शेतकरी विक्री केलेला माल व्यापारी वर्गाकङुन रक्कम वसूल करणे शेतकरी हिताचे अधिक निर्णय पाटील यांनी घेतले होते पण त्यांच्या अचानक बदली मुळे सर्वांनाच धक्का बसला होता आता त्यांच्या बदलीला स्थगिती दिल्यामुळे पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई सुरू होणार आहे
सचिन पाटील यांची बदली झाल्यानंतर जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी गावागावात बदली थांबवण्याचे फलक लावले प्रशासनाला निवेदन दिले होते पाटील यांनी बदलीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली नुकताच काल न्यायालयाने पाटील यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा अन्यथा आदोंलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना च्या नेत्यांनी दिला होता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button