Nashik

नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार वाहनांची चोरी करणारे गुन्हेगारांना जेरबंद, ०३ गुन्ह्याची दिली कबुली

नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार वाहनांची चोरी करणारे गुन्हेगारांना जेरबंद, ०३ गुन्ह्याची दिली कबुली

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक – नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी
नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे व मोटार वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन चोरलेल्या माला विरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत दीपक पाण्डेय् पोलीस आयुक्त, नाशिक शहर, अमोल तांबे पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ मधुकर गावीत, सहा. पोलीस आयुक्त विभाग – 9, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज पतकी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षकनि सत्यवान पवार व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस ठाणेचे अभिलेखावरील मालमत्ते विरूध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने योजना आखून सदर गुन्हयांचा मानवी कौशल्याने व तांत्रिक पध्दतीने तपास करून खालील नमुद ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) दि.०१/०३/२०२२ रोजी पोलिस कॉन्स्टेबल/२४५० राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत संशयीत इसम प्रविण उर्फ सनी प्रशांत देवरे हा नांदुर नाका येथे आल्याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनीनांदुर नाका परिसरात येथे जाऊन सापळा रचुन संशयीत प्रविण उर्फ सनी प्रशांत देवरे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने व त्याचे दोन साथीदार व एक विधी संघर्षित बालक अशांनी मागील ५ दिवसांपूर्वी रोहीणीनगर येथे घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून पंचवटी पोलीस ठाणेकडीला गुन्हा नोंद ७५/२०२२ भादंवि क ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

तसेच सदर गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास देखील ताब्यात घेवून त्याचेकडे व अटक आरोपीताकडे केलेल्या तपासा दरम्यान त्यांचेकडून खालील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोउनि अशोक काकड हे करीत आहेत.२२,०००/- रू. किं. एक सोन्याची चैन वजन अंदाजे १३ ग्रॅम. जु.वा. कि.अं. 2) ८,०००/- रू. किं. एक सोन्याची बिंदी वजन अंदाजे ०४ ग्रॅम. जु. वा. किं. अं. रू. किं. एक सोन्याची अंगठी वजन अंदाजे ०३ ग्रॅम. जु.वा. किं. जं.,३) ६,०००/- ८,०००/- रू. कि. चांदीच्या कमरबंधचे तुकडे ते अर्धवट जळालेले वजन अंदाजे १५० ग्रॅम.जु.वा.कि.अं. ४) ५,०००/- रू. किं. एक जोड चांदीचे पैजन वजन अंदाजे १०० ग्रॅम. सु.वा. किं.अं.,५)६,०००/-रू. किं. एक नग सोन्याचा कानातील शुमका त्यास वेल असलेला वजन अंदाजे ०३ ग्रॅम.
६)रुपये एकूण ५५,०००/-
२) भद्रकाली पो.स्टे. गुरनं. ४३ / २०२२ भादंवि क. ३७९ प्रमाणे दाखल गुरुयाचे तपासा दरम्यान आरोपी नामे राजेंद्र मधुकर हिरे वय ४० वर्षे, रा सोयगाव, ता.मालेगाव, जि. नाशिक याने पंचवटी पो.स्टे. कडील गुरनं. ६९/ २०२२ भादंवि क. ३७९ प्रमाणे हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचा सदर गुन्हयाचे तपासकामी ताबा घेवुन त्याचेकडे त्याने अजुन अशाप्रकारचे मोटार वाहन चोरीचे कोठे गुन्हे केले आहेत काय या अनुषंगाने कौशल्याने तपास केला असता त्याने पंचवटी पोलीस ठाणेकडील गुरनं. ६२ / २०२२ भादंवि क. ३७९ प्रमाणे हा गुन्हा देखील केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडुन सदर

गुन्हयात चोरीस गेलेली ५०,०००/- किं.ची ऑटोरिखा जप्त करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास कैलास शिंदे हे करीत आहेत. ८/३९१
३) दि. ०२/०३/२०२२ रोजी गुन्हे शोध पथकाचे पोशि/कुणाल पचलोरे व कल्पेश जाधव असे आडगाव नाका भागात गस्त करीत असतांना एक संशयित इसम हा त्याचे ताब्यातील मोटार सायकलने जात असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी सदर इसमास थांबवुन त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता त्याचे ताब्यातील मोटार सायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न होवुन त्याने पंचवटी पो.स्टे. कडील गुरनं. २०/२०२२ भादंवि क. ३७९ प्रमाणे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचेकडून सदर गुन्हयात चोरीस गेलेली १५,०००/- रूपये किंमतीची होडा ड्रीम निओ कंपनीची मोटार सायकल जप्त करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोहवा / १०६६ अरूण चव्हाण हे करीत आहेत.

वरील नमुद प्रमाणे पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकास एकूण ०३ गुन्हयांची उकल करण्यात यश प्राप्त झाले असुन सदरची कामगिरी ही दीपक पाण्डेय पोलीस आयुक्त, नाशिक शहर, अमोल तांबे पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, मधुकर गावीत, सहा. पोलीस आयुक्त विभाग – १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज पतकी यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस उपनिरीक्षक राम घोरपडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, बाळनाथ ठाकरे, पोलिस हवालदार सागर कुलकर्णी, अरूण चव्हाण, पोलिस नाईक/अनिल गुंबाडे, दिपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, राकेश शिंदे, पोलिस शिपाई श्रीकांत कर्पे, गोरक्ष साबळे, नारायण गवळी, घनश्याम महाले, राजेश राठोड, कुणाल पचलोरे, अंबादास केदार, कल्पेश जाधव, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, नितीन जगताप, योगेश सस्कर, अविनाश थेटे, राहुल लमडे, प्रकाश पवार यांनी पार पाडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button