Nashik

नासिक जिल्या तील दिंडो री तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम शुभारंभ

नासिक जिल्या तील दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम शुभारंभ

सुनिल घुमरे नाशिक

कादवा सहकारी साखर कारखान्याचा 44 वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड 19 चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार आहे अशी माहिती अद्यक्ष श्रीराम शेटे,उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव ,प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली आहे.

गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते होणार असून ऍड बाजीराव कावळे,खासदार डॉ भारतीताई पवार, आमदार राहुल आहेर, आमदार दिलीपकाका बनकर,आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार माणिकराव कोकाटे,माजी आमदार रामदास चारोस्कर,माजी आमदार शिरीशकुमार कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे राहणार आहे यावेळी सौ व श्री. मच्छीन्द्र पवार(पाडे),सौ व श्री.खंडेराव दळवी (लखामपूर ), सौ व श्री. विनायक देशमुख (खेडले), सौ व श्री.मधुकर बोरस्ते (हातनोरे), सौ व श्री मिनानाथ जाधव (बोराळे) यांचे हस्ते गव्हाणपूजन होणार आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.पुरेशी ऊस तोड मजूर भरती करण्यात आली असून ऊस तोड कार्यक्रम आखण्यात आला आहे.सदर कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव,संचालक मंडळ व प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button