Aurangabad

नासाच्या कोणत्याही पॅनलवर दिक्षा शिंदेंची निवड झाली नसल्याचा नासाचा खुलासा

नासाच्या कोणत्याही पॅनलवर दिक्षा शिंदेंची निवड झाली नसल्याचा नासाचा खुलासा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मागील आठवड्यात 14 वर्षीय दीक्षा शिंदे हिची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याची माहिती उघडकीस आली होती. परंतु दिक्षा नासाच्या कोणत्याही पॅनलवर नसून तिला कोणतीही फेलोशिप मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नासा कडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर दिक्षाने संशोधन पेपर स्वीकारण्याचा दावा केला होता, हा दावाही नासाने फेटाळून लावला आहे. वुई लिव्ह इन ब्लॅकहोल? हा एक संशोधन पेपर मी सादर केला होता. या माध्यमातून अल्पसंख्याक सेवा संस्था (एमएसआय) फेलोशिपच्या व्हर्चूअल पॅनलिस्ट द्वारे आपली नासाने नियुक्ती केल्याचा दावा दिक्षाने केला होता. यासाठी नासाकडून मानधन मिळते असेही तिने म्हटले होते.

नासाकडून भारतीय मुलीची निवड झाल्याची माहिती कळताच याबाबत विचारपूस करण्यासाठी ए एन आय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला असता या ई-मेलला नासाच्या केटरिंग ब्राऊन यांनी उत्तर दिले असून यामध्ये दीक्षा शिंदे नासाच्या कोणत्याही पदावर नियुक्त नसून तिला कोणतेही मानधन देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया ही थर्ड पार्टीकडून केली जाते. दीक्षा बद्दल चुकीच्या माहितीच्या आधारे विनंती करण्यात आलेली होती. या फेलोशिपसाठी फक्त अमेरिकेचे नागरिक पात्र असून नासाकडून दीक्षाचा एकही संशोधन पेपर स्वीकारण्यात आलेला नाही. त्याचबरोबर दिक्षाचा अमेरिका दौऱ्याचा खर्चही नासा करणार नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास नासाचे महानिरीक्षक कार्यालय करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button