Nashik

नारायणगाव खेरवाडी. विलास पाटील यांचा असाही एक आदर्शवत पणा”

नारायणगाव खेरवाडी. विलास पाटील यांचा असाही एक आदर्शवत पणा”

शांताराम दुनबळे नाशिक।

नाशिक : निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी गावच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपाताई विलास पाटील यांचे पती श्री. विलास पुंजाराम पाटील यांनी स्वतःच्या घराचे उतारे घेतल्यानंतर स्वतःहून ४० रुपयाची सामान्य पावती देऊन ग्रामपंचायत चा कर भरून सर्व ग्रामपंचायत सदस्य व समाज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामपंचायत म्हणजे, ग्रा.प. सदस्य मंडळाचीच मालमत्ता किंवा आम्ही जे करू तेच खरे या रुजलेल्या विचाराला फाटा देत *सामाजिक विचाराने पछाडलेल्या श्री.विलास पाटील यांनी “ना खांयेगे नाही खाणे देंगे”* या तत्वाला प्राधान्य देत, ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य मंडळ यांचा पारदर्शी कारभार होण्यासाठी केले मग सांगितले” या विचाराने स्वतःहून ग्रामपंचायत चा कर भरला. व यापुढे ग्रामपंचायत चे कुठलेही दाखले, उतारे, शौचालय, घरकुल व अन्य कामासाठी ग्रामस्थांनी वाढीव पैसे न देता शासकीय फी देऊन ग्रामपंचायत कराची सामान्य पावती मागून घ्यावी असे कोणी जादा पैसे मागितले व पावती देण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन श्री.विलास पाटील यांनी केले.
जनतेने आपल्याला ज्या आशेने निवडून दिले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, गोरगरीब व सर्व सामान्य जनतेचे मुलभूत व सार्वजनिक कामे होऊन त्यांना योग्य न्याय मिळवून आपल्या *खेरवाडी गावातून भ्रष्टाचाराची कीड* नाहीशी करण्यासाठी नागरिकांनी ही आता सतर्क राहून ग्रामपंचायत प्रशासन व संचालक मंडळास सहकार्य केले पाहिजे असेही विलास पाटील यांनी पत्रकार राजेंद्र आहेर व पत्रकार विजय केदारे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले यांच्या या आदर्शवत पणाचे अभिनंदन राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व निफाड तालुका महिला अध्यक्ष रत्‍नाबाई पवार व चंद्रकला केदारे शोभा गोधडे आदी महिला यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री विलास पाटील व ग्रामपंचायत सदस्य रूपाताई पाटील यांचे अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button