MaharashtraNandurbar

नंदुरबार एम आई एम चे नवीन जिल्हाध्यक्ष जीशान पठाणला घरचा अहेर, शहादा येथेच कडाडून विरोध. सोशल मीडीयाच्या माध्यमाने जनतेचा विरोध, पक्ष श्रेष्ठींना प्रश्नांची भरमार. मात्र उत्तर कोणाकळुन ही नाही.

नंदुरबार एम आई एम चे नवीन जिल्हाध्यक्ष जीशान पठाणला घरचा अहेर, शहादा येथेच कडाडून विरोध.
सोशल मीडीयाच्या माध्यमाने जनतेचा विरोध, पक्ष श्रेष्ठींना प्रश्नांची भरमार.
मात्र उत्तर कोणाकळुन ही नाही.

नंदुरबार : एम आई एम पक्ष श्रेष्ठींनी शहादा नगर पालिका निवडणुका 2021 डोळ्यासमोर ठेवुन मागिल 10 वर्षां पासुन सतत असलेले नंदुरबार जिल्हाध्यक्षाची तडकाफडकी पदोन्नती करून शहादा येथील कट्टर कॉंग्रेसी परिवारातील नव युवक जीशान पठाण याला पक्षात प्रवेश देवुन त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाने नवाजले.
मिळालेल्या माहितीनुसार काही वेळच गेली असता पठाणचा घमंडी स्वभाव, अरेरावीची भाषा, पैशांचा जोम तसेच त्याचे सोबत पक्षात नवीन आलेले सोबतींची कार्यकर्ते व शहरातील जनतेशी अरेरावीची भाषा मुळे त्याच्या विरुद्ध शहादा येथेच कमालीचे वातावरण तापले आहे.
वर्ष 2016 मध्ये येथे एम आई एम पक्षाने रफत हुसैन यांच्या नेत्रुत्वात पहिल्यांदाच चार उमेदवार देवुन चार चे चार उमेदवारांना विजय मिळवुन दिले होते। परंतु आत्ताची रणनिती पक्षालाच महाग पड़तांना दिसत आहे.
शहादा येथील आमच्या सूत्रांनी पाठवलेल्या ग्रुप मेसेजसची स्क्रीनशॉट्स पाहता नवीन जिल्हाध्यक्षचा घरीच कमालीचा विरोध दिसत आहे. या सर्व प्रकारवर इतर पक्षांच्या ही नजरा असुन ना भूतो ना भविष्यती भर मुस्लिम वस्तीत नूक्तेच शिव सेनेचे जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
डोक्यावर निवडणुक असुन पक्ष यावर काय मार्ग काडतील, नवीन जिल्हाध्यक्ष किती सार्थक ठरेल किंवा पक्षश्रेष्ठी अजुन काही तडकाफडकी निर्णय घेवुन आपले मोहरे बदलतील ? पक्षाचे अंतर्गत वाद पाहता नाराज मंडळी कुठे वडतिल याकडे जिल्ह्यातील विशेषकर शहादेकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button