Amalner

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त चौकाचे नामकरण व फलक अनावरण संपन्न…

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त चौकाचे नामकरण व फलक अनावरण संपन्न…

अमळनेर नगरपालिकेने गुर्जर समाजाची मागणी मान्य करत नगरसेवकांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल जयंती व एकता दिनाचे औचित्य साधून अमळनेर नगरीत काल गलवाडे रस्त्यावर सरदार वल्लभभाई पटेल चौकाचे नामकरण करून फलक अनावरण नॅनो तज्ञ प्रा डॉक्टर एल ए पाटील नगरसेवक शाम पाटील व नगरसेवक मनोज पाटील ,सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी , गुर्जर भवनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्याहस्ते करण्यात आले , नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नाने मागणी मंजूर केल्याचे पत्र नगरसेवकांनी गुर्जर समाजाच्या लोकांना सुपूर्द केले , यावेळी दोडे गुर्जर भवन समितीचे माजी अध्यक्ष डॉ एल डी चौधरी , सचिव सी एस पाटील , प्रा डॉक्टर धनंजय चौधरी , अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील , अनिल चौधरी ,डी एम पाटील , समाधान पवार ,लक्ष्मण गुर्जर , केदार पाटील , श्रीकृष्ण पाटील , मघन चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते , कार्यक्रमात प्रास्तविक मघन भाऊसाहेब यांनी केले तर सुत्रसंचालक प्रा धनंजय चौधरी यांनी केले तर आभार सी एस पाटील यांनी मानले , यावेळी तालुक्यातील गुर्जर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते , कार्यक्रमात नगरपालिककेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सह नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button