Ratnagiri

नामदार यशोमती ठाकुर पालकमंञी अमरावती यांची मंञीमंडळातून हाकलपट्टी करा व फौजदारी गुन्हा दाखल करा:बिरसा क्रांती दलाची मागणी

नामदार यशोमती ठाकुर पालकमंञी अमरावती यांची मंञीमंडळातून हाकलपट्टी करा व फौजदारी गुन्हा दाखल करा:बिरसा क्रांती दलाची मागणी

रत्नागिरी: नामदार यशोमती ठाकूर पालकमंञी अमरावती यांना मंञीमंडळातून हकालपट्टी करा व सहाय्यक आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती/कर्मचारी यांना अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र अन्य जातीच्या लोकांना जबरदस्तीने देण्यासाठी दबाव आणत धमकावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा,अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित पवार, मा.श्री. अनिल देशमुख गृहमंत्री, मा.अॅड.के.सी.पाडवी आदिवासी विकास मंञी यांच्या कडे दिनांक 27/10/2020 रोजीच्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यशोमती ठाकुर पालकमंञी अमरावती यांची काँग्रेस पक्षातूनही हाकलपट्टी करा,अशी मागणी मा.श्री. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पार्टी यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीम.यशोमती ठाकूर पालकमंञी अमरावती यांनी गोवारी समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मा.सहाय्यक आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती येथील कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी यांना दबाव आणत गोवारी समाजाच्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र जबरदस्तीने देण्यासाठी धमकावत आहेत. असा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत आहे.सदर प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. श्रीम .यशोमती ठाकूर ह्या जात वैद्यता प्रमाणपत्र पञाची प्रकरणे तात्काळ निकाली काढून यांना आताच प्रमाणपत्रे द्या! नाहीतर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करते,तुम्हाला सस्पेंड करते ,अशी धमकी देत कर्मचारी यांच्यावर दबाव आणत आहेत. आरक्षण हा आदिवासी समाजाचा संविधानिक हक्क असून त्यामध्ये अन्य कोणत्याही जातीचा समावेश जबरदस्तीने करणे,दुसर्या जातीच्या लोकांना अनुसूचित जमाती चे दाखले-प्रमाणपत्रे जबरदस्तीने द्यायला लावणे,ही एक गंभीर बाब आहे. काही जातीचे लोक गैरमार्गाने अनुसूचित जमातीचे फायदे घेत आहेत व फायदे घेऊ इच्छित आहेत.ज्या जातीचा आदिवासी समाजाशी काही संबंध नाही अशा जातींना अनुसूचित जमातीत समावेश करणे व त्या जातीच्या लोकांना जात प्रमाणपत्रे देणे हे संविधानिक विरोधी व जात पडताळणी कायद्याविरोधी आहे. गेल्या काही वर्षापासून काही जातीचे लोक अनुसूचित जमाती चे नोकरी व आरक्षणामध्ये गैर मार्गाने फायदे घेऊ इच्छित आहेत,त्यांना आमचा आदिवासी समाजाचा तिव्र विरोध आहे व विरोध कायम राहील. संविधानिक हक्क व न्यायालयीन प्रकरण बाबींत श्रीम.यशोमती ठाकूर पालकमंत्री अमरावती यांनी बेशिस्त व उद्धटपणे केलेले वर्तन योग्य नाही. आदिवासी हक्क व आरक्षणासंबंधीत कुठलीही बाब आदिवासी समाज खपवून घेणार नाही व जबरदस्तीने अन्य कुठल्याही जातीला अनुसूचित जमाती चे प्रमाणपत्रे द्यायला लावणे ही बाब तर अजिबात खपवून घेतली जाणार नाही. श्रीम .यशोमती ठाकूर पालकमंञी अमरावती यांनी गोवारी समाजाच्या लोकांना जबरदस्तीने जात वैद्यता प्रमाणपत्र द्यायला लावण्यासाठी सहाय्यक आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती येथील कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी यांना दबाव टाकत जातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर तुम्हाला सस्पेंड करते,तुमच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करते अशा पद्धतीने धमकावले आहे.सदर गैरकृत्य पालकमंञी पदाच्या व्यक्तीस अशोभनीय आहे.म्हणून श्रीम .यशोमती ठाकूर यांना तात्काळ मंञीमंडळातून काढून टाका व कर्मचारी यांना धमकावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा.व सहाय्यक आयुक्त जात पडताळणी समिती अमरावती येथील कर्मचारी यांना योग्य ते संरक्षण द्या हीच नम्र विनंती.
अन्यथा नाईलाजाने संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.असा इशाराही बिरसा क्रांती दल संघटनेने शासनाला दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button