चांपा/नागपूर

नागपुर जिल्ह्यातील चांप्यात आढळले तिन अश्मयुगीन शिळावर्तुळ

नागपुर जिल्ह्यातील चांप्यात आढळले तिन अश्मयुगीन शिळावर्तुळ

अनिल पवार
चांपा ता , १५ :नागपुर जिल्ह्यातील उमरेडच्या दुर्गम जंगलव्याप्त चांपा परिसरात नागपूर – उमरेड राष्ट्रीय महामार्गावर नागपूर पासून १८ कि.मी.वर चांपा गाव आहे. चांपा परिसरात तिन प्राचीन शिळावर्तुळे आढळली आहेत. या शिळावर्तुळांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अश्मयुगीन इतिहासाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरातत्व खात्याने या भागात संशोधन करण्याची गरज आहे.उमरेड तालुक्यातील चांपा शिवारात लहान मोठे अशीही शिळावर्तुळे आढळली.

चांपा येथील सरपंच अतिश पवार यांनी चांपा परिसराची पाहणी करतांना आपल्या परिसरात तिन शिळावर्तुळ असल्याचे निदर्शनास आले .सरपंच अतिश पवार हे इतिहासाचे जाणकार असल्याने त्यांनी इतिहास या विषयांत एम .ए केले आहेत .त्यांना आपल्या शिवारात लहान मोठे असे तिन शिळावर्तुळ असल्याचे आढळले असून लवकरच छायाचित्रे घेऊन पुरातत्व खात्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले आहे. पुरातत्त्व विभागाने चांपा परिसरात येऊन संशोधन करावे, अशी मागणी ही ग्रामपंचायत मार्फत करणार असल्याचे यावेळी सांगितले .

महाराष्ट्रात शिळावर्तुळे आढळण्याचे प्रकार यापूर्वीही घडले. नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग आदी परिसरासह कर्नाटकातही शिळावर्तुळे यापूर्वी सापडली. मात्र नागपुर ते उमरेड महामार्गावरील चांपा या गावात पहिल्यांदाच हा प्रकार पुढे आला आहे. चांपा शिवारात आढळलेल्या तिन्ही शिळावर्तुळांची त्रिज्या साधारण १५ ते २० फुटांची आहे. गेल्या वर्षीच २०१८ मध्ये यवतमाळ , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर, घुमडे या गावात अशीच शिळावर्तुळे आढळली.

अश्मयुगीन अंधश्रद्धेची प्रथा
अश्मयुगीन कालखंडात शिळावर्तुळांची प्रथा होती. एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह पुरल्यानंतर सभोवती विशिष्ट आकारातील दगडांचे वर्तुळ करण्याची ही प्रथा होती. त्यामागे काहीशी अंधश्रद्धाही असल्याचे सांगितले जाते. मृत व्यक्तीचा पुनर्जन्म होईल आणि पुनर्जन्म होताच त्याला त्याच्या आवडीच्या वस्तू मिळाव्या या उद्देशाने ही शिळावर्तुळे केली जात होती. मृत व्यक्ती राजा असेल तर मोठ्या आकाराच्या शिळा वापरल्या जायच्या. लहान मूल असेल तर छोटे दगड वापरले जायचे, अशी माहिती पुरातत्व खात्याच्या एका सहसंचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर एका वृत्त पत्राने दिली होती .

शिळावर्तुळ म्हणजे काय ?
प्रेत दफन केल्यानंतर मृत व्यक्तीच्या आवडीच्या वस्तू मध्यभागी ठेऊन सभोवताल दगडांचे वर्तुळ केले जाते. हे दगड मोठे आणि विशिष्ट आकारातील आढळतात. शिवाय विशिष्ट अंतर ठेऊन दगडांची सलग रचना शिळावर्तुळात आढळते. अश्मयुगीन कालखंडात हा प्रकार केला जात होता, असे सांगितले जात होते. आता चांपा परिसरात आढळलेली शिळावर्तुळांचा व्यास यापूर्वी आढळलेल्या वर्तुळांपेक्षा मोठा आहे. येथे संशोधन झाल्यास अश्मयुगीन कालखंडाच्या खाणाखुणा सापडण्याची शक्यता आहे.

सध्या शेतात पीक नसल्यामुळे शेताच्या कडेलाच जंगलही काहीसे निष्पर्ण असल्यामुळे ही शिळावर्तुळे मला सहज दिसली. उत्सुकतेपोटी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना त्याची छायाचित्रे पाठवून संशोधनाची मागणी ग्रामपंचायत मार्फत करणार आहे.
– *अतिश पवार*
सरपंच , गट ग्रामपंचायत चांपा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button