Kolhapur

न्यू हायस्कूल बेलवळे खुर्द चे घवघवीत यश

न्यू हायस्कूल बेलवळे खुर्द चे घवघवीत यश

सुभाष भोसले
अर्जुन नगर निपाणी येथे घेण्यात आलेल्या 17 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये *न्यू हायस्कूल बेलवळे खुर्द तालुका कागल* या प्रशालेचा विद्यार्थी कुमार *अमर बाळासो पाटील* याने 3000 मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच उंच उडी या प्रकारांमध्ये कुमारी *विद्या सुरेश डावरे* हिने द्वितीय क्रमांक पटकावला या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्याच बरोबर *विजय बाबासाहेब पाटील* या विद्यार्थ्याने 800 मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक बी एम कांबळे व वाय. एस. वाईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले व शाळेचे मुख्याध्यापक एस आर पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
जय हनुमान शिक्षण संस्थेचे संस्थापक दिनकर कोतेकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button