Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसीसाठी नागेश फाटे आग्रही उद्योगमंत्री तटकरे आणि पालकमंत्री भरणे यांना साकडे

पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसीसाठी नागेश फाटे आग्रही उद्योगमंत्री तटकरे आणि पालकमंत्री भरणे यांना साकडे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, नागेश फाटे यांनी २२ जिल्ह्याचा दौरा पार पाडला. विविध विभागातील उद्योगा संदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जन्मभूमी असणाऱ्या पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीची उभारणी व्हावी ,याकरिताही प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री ना. आदिती तटकरे तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. पंढरपूर तालुक्याच्या एम आय डीसी संदर्भात कल्याणराव काळे व भगिरथ भालके यांच्या मार्फत पाठपुरावा करणार आहे असे नागेश फाटे यांनी सांगीतले .पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी उभारणीसाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाला तो युती शासनाच्या काळात दिवंगत वसंतदादा काळे यांनी पंढरपूर मध्ये कॅबीनेट बैठक लावून एम आय डी सी संदर्भात प्रामुख्याने हा विषय लावून धरला होता, व नंतर दिवंगत आ. भारत भालके यांच्या काळात. त्यांनी यासंदर्भात मोठे प्रयत्न केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्षपद घेतलेल्या नागेश फाटे यांनी, प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसत आहे . त्यांनी या संदर्भात नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री श्रीमती ना. आदिती सुनील तटकरे यांची या संदर्भात भेट घेतली आहे. याबरोबरच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेही याबाबत आग्रह धरला आहे. या दोन्ही मंत्री महोदयांना यासंदर्भातील निवेदन देऊन, एमआयडीसी उभारणीचा आग्रह धरला आहे.पंढरपूर तालुक्यात मोठा शैक्षणिक विकास झाल्याने, अनेक तरुण सुशिक्षित बनले आहेत . वाढत्या बेरोजगारीमुळे त्यांना कामधंद्यासाठी शहरी भागाकडे जावे लागत आहे. पुणे – मुंबई या ठिकाणच्या सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे, अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. शिक्षण घेऊनही नोकरीची संधी उपलब्ध होत नसल्याने, पंढरपूर तालुक्यात बेरोजगारीचे मोठे प्रमाण आहे . पंढरपूर तालुक्यात अनेक दिवसापासून फक्त चर्चेत असणारी एमआयडिसी मंजूर झाल्यास, येथील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे मत , त्यांनी संबंधित मंत्री महोदयांकडे व्यक्त केले आहे.
तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यात एमायडिसी उभारणीकामी फार उशिरा प्रयत्न सुरू झाले. एमायडिसी उभारण्याची मागणी तरुणांकडून होऊ लागताच, गेल्या दहा वर्षापूर्वी तत्कालीन आ. कै. भारत भालके यांनी प्रयत्न सुरू केले. त्याच काळात पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडीच्या माळावरील जागेची पाहणी, सरकारी पथकाकडून करण्यात आली होती, यानंतर मात्र हा विषय स्थगित झाला होता. यानंतर तब्बल दहा वर्षांनी राष्ट्रवादी नागेश फाटे यांनी या विषयास वाचा फोडली आहे. राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नागेश फाटे यांनी सुरू केलेल्या, या प्रयत्नास कितपत यश येते हे आगामी काळच सांगून जाणार आहे. एमायडिसी उभारणी सारखा ज्वलंत प्रश्न हाताळणाऱ्या, नागेश फाटे यांचे तालुक्यातील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.

चौकट

राष्ट्रवादीचे उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी पंढरपूर तालुक्यात, एमायडिसी उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे स . सा . का . चेअरमण कल्याणराव काळे तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली, आपण हे प्रयत्न तडीस नेणार असल्याची प्रतिक्रिया, नागेश फाटे यांच्याकडून देण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button