Nashik

मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका बहुजन कष्टकरी विद्यार्थ्यांचे ज्ञान केंद्र बनावे : गायिका कडूबाई खरात यांचे प्रतिपादन.

मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका बहुजन कष्टकरी विद्यार्थ्यांचे ज्ञान केंद्र बनावे : गायिका कडूबाई खरात यांचे प्रतिपादन

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभुमी अभ्यासिका हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान केंद्र बनावे. भविष्यात मुक्तिभुमी वाचनालय व अभ्यासिका भव्यदिव्य स्वरूपात उभी रहावी, ग्रामीण कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार अशा बहुजन समाजातील सर्व मुला-मुलींना इथून चालना मिळावी यासाठी मी स्वतः व महाराष्ट्रातल्या दानदात्यांनी पुढाकार घेऊन निधी व पुस्तकं दान द्यावेत यासाठी प्रयत्न करेल येवला नगरपरिषद महाराष्ट्र शासनाने,जनतेने सुद्धा ह्या ऐतिहासिक भूमीत सुरू असलेला ज्ञानदानाच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गानकोकिळा कडूबाई खरात यांनी केले आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शाहिरी गीत कवनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तन प्रबोधनाचा विचार व धम्म कार्याचा वारसा लोकांमध्ये जाऊन सांगितला त्यांच्या नावाने माझे बंधू शरद शेजवळ सर यांनी स्थापन केलेल्या या वाचनालय व अभ्यासिके मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने असलेल्या या एकमेव अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे हित साधले जाईल व अशा लोक उपयोगी संस्था व कार्याला बळ मिळेल असा प्रयत्न समाजाने जाणीवपूर्वक करून या कार्याला मदत करावी असे आवाहन कडूबाई खरात यांनी येथील मुक्ती भूमी वाचनालय व अभ्यासिका सदिच्छा भेट देते प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र वाघ होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिभुमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले यावेळी अभिमन्यू शिरसाट कवी धम्मा गवई,ज्ञानेश्वर खरात विकास खरात,सपकाळ मास्तर,अक्षय गरुड,सुमित गरुड व अभ्यासिका वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक मुक्ती भुमी येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण कडूबाई खरात यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सिद्धार्थ हिरे, सुरेश मामा खळे, शैलेंद्र वाघ शरद शेजवळ, भाऊसाहेब झाल्टे मयूर सोनवणे,सचिन बोधारे,मनोज गुंजाळ, सिद्धार्थ गुंजाळ,आम्रपाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ,आभार वसतिगृहाचे अधीक्षक बी.डी. खैरनार सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button