Nashik

मा. ना. श्री नरहरी झिरवाळ(विधानसभा उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते वनारे ता.दिंडोरी येथे विद्यार्थी वाचनालयाचे शानदार उद्घाटन.

मा. ना. श्री नरहरी झिरवाळ(विधानसभा उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते वनारे ता.दिंडोरी येथे विद्यार्थी वाचनालयाचे शानदार उद्घाटन.

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा . लिना बनसोड मॅडम व प्राथ . शिक्षणाधिकारी मा.श्री . राजीव म्हसकर साहेब यांच्या संकल्पनेतून,तसेच आपल्या तालु क्याचे कुशल नेतृत्व मा . गट शिक्षणाधिकारी श्री . कनोज साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच के. पी. सोनार शिक्षण विस्तार अधिकारी देवसाने, आर. के. धात्रक केंद्र प्रमुख पिंपळपाडा, यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत वनारे यांच्या प्रोत्साहनाने शाळा बंद- शिक्षण सुरू व गाव तेथे वाचनालय* या उपक्रमाअंतर्गत वनारे ता.दिंडोरी येथे विद्यार्थी वाचनालयाचे उद्घाटन मा. ना. श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.१२/०८/२०२० रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आले.
शाळा बंद – शिक्षण सुरू या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गाव तेथे वाचनालय या उपक्रमांतर्गत विद्यार्थी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थी व सुशिक्षित तरूण वर्गांने लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष मा. ना. श्री नरहरी झिरवाळ सो.यांनी केले.

१)वाचनालयाची स्तुत्य संकल्पना मा.विधानसभा उपाध्यक्ष यांना खूपच आवडल्याने,त्यांनी वाचनालयासाठी त्याच ठिकाणी २१००० रुपये पुस्तके घेण्यासाठी रोख स्वरुपात शाळेतील शिक्षकांकडे सुपूर्त केले.
१४ वित्त आयोग निधी मधुन ई लर्नींग साहित्य अंतर्गत ग्रामपंचायत वनारे मार्फत शाळेस सोनी कंपनीचा स्मार्ट टीव्ही किमंत १,२४,९९९ व सोनी कंपनीचा साऊंड सिस्टीम किंमत ६८,९९० शाळेस भेट दिले. तसेच जिल्हा परिषद शाळा खुंटीचापाडा यांना सोनी कंपनीचा साऊंड सिस्टीम रु. ६८,९९०भेट देण्यात आला
प्रसंगी श्री.के. पी. सोनार शिक्षण विस्तार अधिकारी देवसाने, आर. के. धात्रक केंद्र प्रमुख पिंपळपाडा, यांनी विद्यार्थी वाचनालयासाठी ५० पुस्तकांचे संचभेट दिले. शाळेतील शिक्षकांनी मुलांना अभ्यासासाठी प्रत्येकी एक वही भेट देण्यात आली.
या वेळी बी.डी.कनोज (गट शिक्षणाधिकारी दिंडोरी ,) मा.दिपक झिरवाळ सरपंच वनारे, प्रकाश मुरलीधर झिरवाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, एस. पी. पगार शिक्षण विस्तार अधिकारी कोशिंबे, के. पी. सोनार शिक्षण विस्तार अधिकारी देवसाने, आर. के. धात्रक केंद्र प्रमुख पिंपळपाडा, जेट्टे ग्रामसेवक वनारे, वनारे शाळेचे मुख्याध्यापक संदिप चौधरी, दिनेश यशवंत सहारे, गीता महादू गावीत, रामदास अनाजी कराटे शाळा धोंडाळपाडा, यादव पांडुरंग खांडवी शाळा खुंटीचापाडा, सोनवणे वारे, कावेरी नामदेव भोये, जयश्री किसन पालवी शाळा भनवड आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ मधुकर झिरवाळ, नवनाथ झिरवाळ, रमेश झिरवाळ, मोहन पाटील, अशोक भोये, विनोद झिरवाळ, प्रकाश झिरवाळ, अरुण गायकवाड, संदीप चौधरी मु ख्याध्यापक वणारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी स्वयंसेवक विनोद झिरवाळ, योगेश झिरवाळ, भरत भोये यांचा शाळेचा वतीने सत्कार करण्यात आला.
या अगोदर ग्रामपंचायत मार्फत रस्त्याच्या दुतर्फा नारळ, सुपारी,जांभूळ आदी ३२० वृक्षाचे वृक्षारोपण मा. ना. श्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button