Pandharpur

परिचारिकां विरुद्ध असणाऱ्या सर्वांची मोट बांधणे हेच माझे ध्येय….. मनसे नेते दिलीप धोत्रे

परिचारिकां विरुद्ध असणाऱ्या सर्वांची मोट बांधणे हेच माझे ध्येय….. मनसे नेते दिलीप धोत्रे

प्रतिनिधी
रफिक अत्तार

गेल्या पंचवीस वर्षात पंढरपूर नगर परिषदेचा कारभार पाहणाऱ्या परिचारक मंडळींनी पंढरीचा काही विकास केला नाही, रस्त्यांची दुरावस्था, दोन्ही उद्याने भकास झाली असून, तीर्थक्षेत्राचा विकास झालाच नाही, महाराष्ट्रातील शिर्डी चा विकास पहा तसेच तिरुपती बालाजी चा कायापालट झाला असून पंढरी नगरीचा का होऊ शकत नाही याचे उत्तर परिचारक यांचेकडे,आहे का असा सवाल पंढरीतील मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत केला, परिचारक यांना कोणी विरोधात गेले की लगेच त्यांची बी टीम म्हणून कोणालातरी वावड्या उठवायला व्हायच्या हे त्यांचे नित्याचेच आहे, पण मी आता गप्प बसणार नाही तर आगामी नगरपरिषद निवडणुकीत परिचारकांच्या विरोधातील सर्वांना एकत्र करून परिचारकांची नगरपालिकेतील सत्ता घाल वणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले या पत्रकार परिषदे वेळी मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, मात्र गेल्या काही दिवसापासून गाजत असलेली काका बापू जोडी या पत्रकार परिषदेत वेळी दिसून आली नाही बापू एकटेच किल्ला लढवित होते , परिसर खान विरोधात बोलताना आज दिलीप बापू खूपच आक्रमक झाले होते, हा आक्रमकपणा कायम राहील की नाही हा येणारा काळच सांगेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button