Maharashtra

कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून करू नका

कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून करू नका
रोटरी क्लब चोपडा च्या 50 व्या ऑनलाइन पदग्रहण सोहळा प्रसंगी प्रा अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी लतीश जैन

येथील रोटरी क्लबचा 50 वा पदग्रहण सोहळा ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते . मी 50 व्या पदग्रहण सोहळाचा साक्षीदार आहे व सदर कार्यक्रमाची संधी मिळणे माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे.कोविड किती दिवस चालेल कोणी सांगू शकत नाही पण वेबिनार ,ऑनलाइन याद्वारे आपण आपले अटॅचमेंट, आपली सामाजिक बांधिलकी जोपासू या आणि निरंतर काम करत राहू या . सेवा करताना आत्मविश्वास असावा.

बदललेल्या अवस्थेत आणि व्यवस्थेत आपल्याला काम करावे लागेल. गरज लक्षात घेऊन प्रकल्प राबवावेत. रोटरी ही सेवाभावी संस्था आहे आणि चोपडा रोटरीने अत्यंत प्रभावी काम केलेले आहे. गौतम बुद्धांनी आपल्याला सेवेचे खरे रूप व व्रत समाजाला दिले आहे. काम करताना सर्वांना सोबत घेऊन चला .युनिटी कायम ठेवावी असा मौलिक सल्ला प्रा अरुणभाई गुजराथी यांनी दिला .रोटरी क्लब चोपडाच्या 50 वा पदग्रहण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झूम मीटिंग द्वारे मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी सर्वप्रथम रोटरी प्रार्थनेने व गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. चोपडा रोटरीचे रोप स्वर्गीय वल्लभ दादा यांनी लावले होते व त्यास खतपाणी प्रा अरुण भाई गुजराथी यांनी घातले होते तर हा 50 वा पदग्रहण सोहळा ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जात आहे .सदर पदग्रहण सोहळा सोशल डिस्टेन्सचे पालन करत ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. पोल हैरिस यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .प्रांतपाल शाकीर शब्बीर ,उपप्रांतपाल योगेश भोळे ,उपप्रांतपाल पुनम गुजराथी यांचे ऑनलाइन पद्धतीने स्वागत करण्यात आले तसेच पदग्रहण सोहळा प्रसंगी माजी रोटरी अध्यक्ष नितीन जैन यांनी नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याकडे पदभार दिला व माजी मानद सचिव धिरज अग्रवाल यांनी नूतन मानद सचिव ऍड रुपेश पाटील यांच्याकडे पदभार दिला. सदर पदग्रहण सोहळ्याचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष नितिन जैन यांनी केले त्यांनी वर्षभरात राबवलेले उपक्रम – प्रकल्प त्यात आदर्श शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी निवड पुरस्कार, गरजूंना कपडे वाटप ,फिटनेस कैम्प, गर्भवती महिलांसाठी कॅम्प, आशा वर्कर साठी कॅम्प, मास्क व पीपीई कीट वाटप, कोविड सेंटरसाठी 21 हजाराची मदत ,मानव सेवा तिर्थ वेले येथे 800 स्क्वेअर फुटचे शेड उभारणे ,शंभर बेडची व्यवस्था इत्यादी बाबींचा उल्लेख केला तसेच या नुतन वर्षी रोटरी क्लब चोपडा मध्ये नवीन सदस्य जॉईन झाले त्यांच्या परिचय करून देण्यात आला त्यात डॉ पराग पाटील, डॉ अमोल पाटील ,संदीप क्षीरसागर (व्यवस्थापक एस. टी. डेपो चोपडा) ,चंद्रशेखर साखरे, पंकज पाटील ,मनोज पाटील ,डॉ सचिन कोल्हे इत्यादी नवीन सदस्यांच्या परिचय करून देण्यात आला .नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव व नूतन मानद सचिव अड़ रूपेश पाटील यांच्या सत्कार अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला .नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी आपल्या मनोगतात रोटरी अध्यक्षपद माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि माझ्या कारकिर्दीत मी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले त्यात 3 E वर भर देणार म्हणजे त्यात इझी ,इफेक्टिव एन्जॉयफुल असेल असे सांगितले तसेच गुणवंतांचा सत्कार ,डॉक्टर दिवस ,कृषी दिवस, करियर गाईडन्स ,वाटर एटीएम मशीन ,रत्नावती नदीच्या गाळ काढणे ,रेन वॉटर हार्वेस्टिंग, शाळांना ई-लर्निंग सेट देणे ,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, अल्पदरात मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणे ,आरोग्य विषयक विविध प्रोजेक्ट राबवणे, शाळा दत्तक घेऊन विविध सुविधा पुरविण्याच्या मानस असल्याचे सांगितले तसेच यावर्षीची टीम मध्ये अध्यक्ष म्हणून नितीन अहिरराव मानद सचिव म्हणून ॲड रुपेश नेवे ,नितीन जैन, पंकज बोरोले, अप्रित अग्रवाल ,पवन गुजराथी, भालचंद्र पवार ,आशिष गुजराथी ,संजीव गुजराथी, विलास एस पाटील, डॉ नीता जयस्वाल, सुनील सचदेव, एम डब्ल्यू पाटील यासह विविध समित्यांचे त्यांनी वाचन केले .
प्रा अरुणभाई गुजराथी यांच्या ऑनलाईन परिचय त्यांच्या स्नुशा पूनम गुजराथी यांनी मार्मिक शब्दात केला. पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रांतपाल शाकीर शब्बीर यांनी आपल्या मनोगतात कोई चीज का दुख नही करना , कोविड नही होता तो मै आज अरुणभाई के बाजूमे बैठा होता .समूह मे लोग जोडते चले जाये, चोपडा वालो का काम बहोत अच्छा है और अच्छा करे अशा शुभकामना त्यांनी दिल्या .त्यानंतर रोटरेक्टचे मावळते अध्यक्ष डॉ ललित चौधरी यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष दिव्यांक सावंत यांच्याकडे सोपविला तसेच मावळते सचिव प्रणय टाटिया यांनी नूतन सचिव चेतन याज्ञिक कडे पदभार सोपविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार मानद सचिव रूपेश पाटील यांनी मानले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button