Nashik

पाटोदा येथील मुस्लिम तरुणांनी केला कब्रस्तान चा कायापालट विविध प्रकारचे फळझाडे लावून जनतेसमोर ठेवला आदर्श

पाटोदा येथील मुस्लिम तरुणांनी केला कब्रस्तान चा कायापालट विविध प्रकारचे फळझाडे लावून जनतेसमोर ठेवला आदर्शशांताराम दुनबळे नाशिकनाशिक : येवला तालुक्यातील पाटोदा येथे २१ ऑगस्ट पवित्र मोहरम चे औचित्य साधून पाटोदा येथील मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन बडा कब्रस्तान मधील विविध समस्या बाबत चर्चा करून, कब्रस्तान स्वच्छ सुंदर कशा पद्धतीने करता येईल याबाबत एकमत झाले. आणि सुरुवात झाली कामाला….
गेल्या अनेक दिवसापासून कबरस्तान मध्ये विविध प्रकारचे काटेरी झाडे व जंगला मध्ये असावे अशा प्रकारचे गवत अशा समस्यांमुळे कबरस्तान मध्ये दफन विधी च्या वेळेस नागरिकाना जाण्यास देखील त्रास होत होता. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या कबरीवर जाऊन काही विधी करावयाचा असला तर तो दुरूनच करावा लागत असे. जिकडेतिकडे कबरस्तान मध्ये गवत व काट्याचे साम्राज्य होते. आणि ह्याच समस्या सोडवण्याच्या दृष्टीने युवकांनी एक पाऊल उचलले प्रथमता जेसीबीच्या साह्याने सर्व काटेरी झाडे काढून कबरस्तान स्वच्छ केला .त्यामध्ये सोयीनुसार रस्ते तयार करण्यात आले, सर्व रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारचे जसे चिंच, पेरू, आंबा संत्री, चिकू ,नारळ, फणस, अशा पद्धतीचे फळझाडे लावण्यात आले. या कामासाठी पाटोदा येथील तरुण तडफदार सरपंच श्री प्रताप पाचपुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच, जामा मज्जिद ट्रस्टचे अध्यक्ष श्री इम्तियाज देशमुख, अजीम मुलानी, मामाश्री बशीर भाई शेख, उपसरपंच रईस देशमुख, ग्रामपंचायत सदस्य उस्मान भाई शेख ,सज्जाद भाई देशमुख, सत्तार भाई शेख, शाबीर देशमुख (सर) ,शरपुदिन देशमुख , अशपाक भाई मुलानी,सादिक पठाण ,रऊफ मुलांनी जाऊ दिन देशमुख , दुले मिया मुलानी, आदींनी वृक्षरोपण केले, तर तुम्ही सर्वांनी केलेल्या ह्या पवित्र कामाची अल्ला दरबारी कशा पद्धतीने दखल घेतली जाते याबद्दल काही दाखले देत जामा मस्जिद चे इमाम रियाज भाई यांनी प्रबोधन केले व या सर्वांचे कौतुक केले

संबंधित लेख

Back to top button