Aurangabad

हनुमान नगरमध्ये टोळीयुद्धातून तरुणाचा खून, संशयित अटकेत

हनुमान नगरमध्ये टोळीयुद्धातून तरुणाचा खून, संशयित अटकेत

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील हनुमाननगर येथे टोळी युद्धातून २२ वर्षीय तरुणाला अडवून रॉड, दांडा, तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता रक्तभंबाळ अवस्थेत तडफडत पडणार्‍या जखमी तरुणावर आरोपींनी लघुशंका करीत व्हिडिओ बनविला. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अजय राजपूत (वय-२२ रा. पुंडलीक नगर) औरंगाबाद असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टोळीशी भांडण झाले. आरोपीचे ज्या टोळीशी भांडण झाले होते.

त्यांच्यासोबत अजयची उठबस होती. रविवारी रात्री अजय हनुमाननगर येथून आरोपीच्या घराजवळून जात असल्याचे दिसताच आरोपींनी अजयला अडविले व चार ते पाच जणांनी तलवार, रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अजय रक्तभंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. त्यानंतर अजयला रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Back to top button