Pune

नवरात्रीत कबड्डी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची कोयता मारून हत्या..!

नवरात्रीत अल्पवयीन मुलीची कोयता मारून हत्या..!

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळत असताना कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ह्या घटनेचे संतापजनक पडसाद उमटले आहेत.सदर घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे.

भविष्यात कबड्डीपटू होऊन राज्याचे देशाचे नाव उज्वल करण्याचे भविष्य पाहणाऱ्या ह्या चिमुकलीचा कबड्डी खेळताना होणारा खून हा अत्यन्त धक्कादायक आहे.पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे.मुली महिला कोणत्याच प्रकारे सुरक्षित नसल्याचे हे उदा आहे.अगदी नवरात्रात ही घटना घडली असून एकीकडे देवीला पुजले जात आहे आणि दुसरीकडे एक चिमुकली नाहक जीव गमावत आहे. समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीची हत्या ही कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button