Jalgaon

खुनाचा आरोपी तपासी अंमलदार स पो नी  राकेशसिंग परदेशी यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे गजाआड..!

खुनाचा आरोपी तपासी अंमलदार स पो नी राकेशसिंग परदेशी यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे गजाआड..!

मेहुण्याच्या सदोष मनुष्यवध प्रकरणी आरोपीस ७ वर्ष सक्त मजूरीची
शिक्षा

पहुर दिनांक २८/१२/२०१९ रोजी ०९.०० ते ०९.३० वाजेच्या सुमारास
फिर्यादी (स्वाती संजय पाटील) हीचा भाउ आरोपी दिवाकर प्रभाकर अटाळे, वय –
४० वर्षे, रा. – देउळगांव गुजरी, ता. जामनेर, जि. जळगांव ह्याने मेव्हणा फिर्यादीचा पती संजय लक्ष्मण पाटील यास मारहाण करून विहिरीत ढकलून देऊन जीवे मारून टाकण्याची घटना 2019 मध्ये घडली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी दिवाकर ने मेव्हणा संजय यास मयत संजय लक्ष्मण पाटील यास मारहाण करुन जमीनीवर पाडुन छातीवर बसून त्याचे हातातील विटाने तोंडावर मारत असतांना त्यांचे नेहमीचे भांडण असल्याने फिर्यादी व तिची मुलगी विद्या संजय पाटील असे घाबरुन घरात जावून आतुन दरवाजा बंद करुन घेतला. त्यावेळी आरोपीने मयतास विटाने तोंडावर मारहाण करुन जवळ असलेल्या विहीरीत फेकले व त्यावेळेस विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज फिर्यादी व तिच्या मुलीस आला.

दुस-या दिवशी सकाळी गावातील लोक जमले त्यावेळेस आरोपीने पुन्हा
सर्वांसमक्ष मयत संजय याचा रात्री मारुन विहीरीत फेकल्याची कबुली दिली’
वरील घटनेवरुन पहुर पोलीस स्टेशन, ता. जामनेर येथे आरोपीविरुध्द
गु.र.क. १२०/२०१९, भा.दं.वि. कलम ३०२ व ५१० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात
आला होता.

सदर गुन्हयाचा तपास अधिकारी ए.पी.आय. राकेशसिंग परदेशी यांनी सर्वांकुश तपासकाम करुन मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी राकेशसिंग परदेशी यांनी तपासात कोणतीही कसूर न सोडता कर्तव्यदक्ष पणे साक्षी पुरावे तपासून सदर दोषरोप पत्र मा न्यायालयात सादर केले त्यामुळे आरोपी दिवाकर यास सदोष मनुष्यवधाचा आरोप सिद्ध झाला असून मा न्यायालयाने सदर आरोपीस शिक्षा सुनावली आहे.

पहुर पो.स्टे. गु.र.न. 308/2019 भा.द.वि. कलम 302 मध्ये आरोपी नामे दिवाकर प्रभाकर जटाळे रा. देऊळगाव गुजरी यास सात वर्षे शिक्षा व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अजून कारावास असेल. तपासी अंमलदार स.पो.नि. राकेशसिंग परदेशी प्रभारी पहूर पोलिस स्टेशन यांनी टेक्निकली पुरावे, प्रत्यक्ष साक्षीदार असे गोळा करून आरोपीस शिक्षा लागली केसवॉच म्हणुन पो.ना. दिनेश मारवडकर यांनी काम पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button