Khandala

तोंडल गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार आमदार मकरंद पाटील

तोंडल गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार आमदार मकरंद पाटील

दिलीप वाघमारे

15 फेब्रुवारी रोजी तोंडल तालुका खंडाळा या गावात वाई महाबळेश्वर खंडाळा चे विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळेची कमान व वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते आमदार पुढे म्हणाले या गावाने लोकवर्गणी मधून प्राथमिक शाळेची कमान बांधून एक जिल्ह्यात आदर्श घडवला त्यांचे ऋण फेडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामाचा डोंगर उभारून आणि त्यासाठी विधायक कामासाठी प्रशासन तुमच्या बरोबर असेल या गावातील एकोपा गुणी शिक्षक विद्यार्थी यांचा आदर्श जोपासल्या सारखा आहे खंडाळा तालुक्यांमध्ये आदर्श गाव म्हणून गणना केली जाईल शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनी घडवून गुरु म्हणून ज्ञान दिले पाहिजे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.तोंडल गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार आमदार मकरंद पाटीलयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री उदय कबुले जि प अध्यक्ष राजेंद्र तांबे सभापती प स खंडाळा सौ दिपाली साळुंके जि प सदस्य सातारा गजाभाऊ हांडे गटशिक्षणाधिकारी मनोज पवार माजी सभापती सातारा माणिकराव बीचुकले गटविकास अधिकारी खंडाळा लक्ष्मणराव शेळके पाटील माझी उपनगराध्यक्ष लोणंद हनुमंतराव शेळके पाटील कुरणे दादा सो शोभा जाधव सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button