Mumbai

Mumbai: भेट दोन मुख्यमंत्र्यांची मात्र चर्चा फोटोतील त्या व्यक्तीची..! सोशल मीडियावर व्हायरल..!पहा काय आहे किस्सा…

Mumbai: भेट दोन मुख्यमंत्र्यांची मात्र चर्चा फोटोतील त्या व्यक्तीची..! पहा काय आहे किस्सा…

मुंबई तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) सोबत, ते देशात तिसरी आघाडी तयार करण्याचे ध्येय घेऊन बाहेर पडले आहेत. मुंबईत आल्यावर केसीआर यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर केसीआर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही बैठक झाली. पण महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेस या चर्चेत सहभागी झाला नाही.

उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीनंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर बसलेल्यांपेक्षा मागे उभे असलेले प्रकाश राज यांचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा होत आहे. प्रकाश राज हे अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत जे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात जोरदार आवाज उठवत आहेत. केसीआर यांच्या तिसर्‍या आघाडीच्या मिशनमध्ये प्रकाश राज त्यांच्यासोबत सावलीसारखे फिरत आहेत.

मुख्यमंत्री झाल्यापासून प्रकाश राज हे त्यांचे निकटवर्तीय बनले आहेत. केसीआर यांनी खूप व्यग्र असूनही २०१४ मध्ये प्रकाश राज यांच्यासोबत दोन ते तीन तास बैठक केली होती. प्रकाश राज हे सध्या मुंबईत चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. अलिकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज यांना केसीआर आपल्या टीममध्ये महत्त्वाचं स्थान देऊ शकतात. प्रकाश राज यांची कर्नाटक आणि तामिळनाडूमधील राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

केसीआर सध्या एमके स्टॅलिन आणि एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत. त्या बैठकांमध्येही प्रकाश राज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एप्रिल २०१८ मध्ये केसीआर राष्ट्रीय आघाडी स्थापनेसंदर्भात देवेगौडा यांना भेटले, तेव्हाही प्रकाश राज त्यांच्यासोबत होते.

प्रकाश राज केसीआर यांच्या टीममध्ये दिसल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्रकाश राज यांना सोबत घेऊन केसीआरने चूक केली? असे ट्विट्स आता समोर आले आहेत. प्रकाश राज यांच्या निमित्तानं भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनावर प्रश्न उपस्थित करणारे केसीआर आणि हिंदूंना शिवीगाळ करणाऱ्या प्रकाश राज यांच्यासाठी शिवसेनेने रेड कार्पेट टाकले आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानणारी ही शिवसेनाही. हे अतिशय वाईट आहे, असा टोला कपिल मिश्रा यांनी लगावला आहे.

Mumbai: भेट दोन मुख्यमंत्र्यांची मात्र चर्चा फोटोतील त्या व्यक्तीची..! सोशल मीडियावर व्हायरल..!पहा काय आहे किस्सा...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button