Mumbai

जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा कंगना राणावत ला फटका..!अटकेचे आदेश…!कंगनाची याचिका फेटाळली..!

जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा कंगना राणावत ला फटका..! अटकेचे आदेश…! कंगनाची याचिका फेटाळली..!

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली बदनामीची कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना रनौतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यानंतर जावेदने कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. जावेद यांनी कंगनावर त्यांच्याविरुद्ध खोटी विधाने करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. कंगनाने याचिका दाखल केली होती. जावेदच्या तक्रारीनंतर चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती.पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे .तसेच आज कोर्टात शबाना आझमी आणि जावेद अख्तर हजर होते पण कंगना मात्र उपस्थित नव्हती परिणामी मुंबई उच्च न्यायालयाने जर कंगना पुढील तारखेस उपस्थित झाली नाही तर अटक वॉरंट काढावे लागेल असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे खटला

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला दाखल केला आहे. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला होता. मात्र हा खटला अजुनही प्रलंबित आहे.

यानंतर डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे. कंगनाला हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणावे असे वाटत असले तरी जावेद अखतर मात्र मागे हटण्यास तयार नाहीत.कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर थलायवी या चित्रपटामुळे सध्या ती चर्चेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button