Nashik

जानोरी मध्ये covid-19 प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप

जानोरी मध्ये covid-19 प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप

सुनील घुमरे

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातजानोरी येथे भागातील लालवाडी व गाडेकरवाडी ग्रामस्थांना ,कोवीड १९ साठी होमिओपँथीक प्रतिबंधात्मक औषध आर्सेनिक अल्बम30 या होमिओपॅथी गोळ्या वाटण्यात आल्या. या गोळ्या जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाकडुन उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचे वाटप हे लालवाडी अंगणवाडी केंद्र, गाडेकरवाडी अंगणवाडी केंद्र येथे वाटप करण्यात आल्या असून ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा.प्रत्येक कुंटुबातील एकानेच यावे
फाॅर्म भरुन दिल्यानंतरच ह्या गोळ्या दिल्या जातील. येतांना तोंडाला मास्क लावूनच यावे. सर्व कुटुंबांना त्या गोळ्या मिळतील एकाच वेळी गर्दी करु नये.असे ग्रा पं मार्फत सांगण्यात आले होते.

ह्या सर्व गोळ्या मोफत देण्यात आले आहे

या वेळी मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ लोणे यांनी ग्रामस्थांना गोळ्या विषयी माहिती सांगितली प्रसंगी सरपंच संगीता सरनाईक , उपसरपंच गणेश तिडके , सदस्य विष्णूपंत काठे. शंकरराव वाघ अशोक केंग. आरोग्य कर्मचारी विजय चौधरी राजेंद्र भवर शिंदे सिस्टर. अंगणवाडी कार्यकर्ते. मदतनीस आदी ग्रामपंचायत जानोरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button