Mumbai

Mumbai Diary: अभिमानास्पद.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा देशाच्या पहिल्या पाच लोकप्रिय यादीत..!पहा यादी व एक नं ला कोण..?

Mumbai Diary: अभिमानास्पद.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा देशाच्या पहिल्या पाच लोकप्रिय यादीत..!पहा यादी व एक नं ला कोण..?

मागच्या कित्येक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार घरातून साभांळत आहेत. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने हाकल्याने देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचा तिसऱ्यांदा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे.उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ यादी बाहेर आहेत.

इंडिया टुडे माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मागच्या वेळी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव यादीच्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे चौथ्या स्थानांवर

इंडिया टुडेकडून देशातील प्रत्येक राज्यात हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ४३ टक्क्यांहून चांगली कामगिरी करणाऱ्या ९ मुखमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. 1. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पहिल्या क्रमांकाची पसंदी मिळाली आहे.
2. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के जनता समाधानी आहे.

3. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर ६७.५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

4.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. ६१.८ टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.

5. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयरन

6.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

7. आसाम चे मुख्यमंत्री हेमंत विस्व सर्मा आहेत.

8. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (५१.४ टक्के)

9.मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री आहे.

10. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button