Mumbai

मुंबई Diary.. गे सेक्स रॅकेट चा पर्दाफाश..!

मुंबई Dairy.. गे सेक्स रॅकेट चा पर्दाफाश..!

मुंबई येथे सुरू असलेल्या गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरातील मालवणी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे रॅकेट ऑनलाइन डेटिंग गे अॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होते. लोकांना ब्लॅकमेल केले जात होते. मालवणी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की पोलिसांना एका व्यक्तीने तक्रार दिली होती. पाच जणांनी धमकावून रोकड आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. आरोपींनी त्या पीडित व्यक्तीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

त्यानुसार आरोपींनी गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका कंपनीच्या अकाउंटंटला जाळ्यात अडकवले होते. त्याच्याकडे प्रतितास एक हजार रुपयांची मागणी केली. सगळे काही ठरल्यानंतर पीडित त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर आधीच उपस्थित असलेल्या पाच जणांनी त्याला मारहाण केली. त्याचा फोन, पाकीट आणि एटीएम हिसकावून घेतले. आरोपींनी त्याला धमकी देत पिन कोडची माहिती घेतली. त्यानंतर पीडित व्यक्तीचा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायल करण्याची धमकी देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button