Nashik

पत्रकार भगवान पगारे यांना मुक्ती स्पेशल इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड इन पत्रकारिता २०२१ ‘ नुकताच प्रदान

पत्रकार भगवान पगारे यांना मुक्ती स्पेशल इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड इन पत्रकारिता २०२१ ‘ नुकताच प्रदान

नाशिक : पत्रकार भगवान पगारे यांना “निर्वाण फाऊंडेशनचा प्रतिष्ठित असा” मुक्ती स्पेशल इंटरनॅशनल
आयडॉल अवॉर्ड इन पत्रकारिता २०२१ ‘ नुकताच प्रदान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात मुक्ती स्पेशल इंटरनॅशनल अवॉर्ड (Journalism) २०२१ हा पुरस्कार संनासी ना बायडोम (साउथ आफ्रिका) मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांचे हस्ते पत्रकार भगवान पगारे यांना प्रदान करण्यात आला.

सामजिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर काम करत असतांना आपल्या आजूबाजूला उल्लेखनीय काम करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्थरावर गौरवण्याचे निर्वाण फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे विदेशी पाहुणे आफ्रिकन स्कॉलर मा. संनासी ना बायडोम यांनी केले.
निर्वाण फाऊंडेशन आयोजित नाशिक येथे आयोजित “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड २०२१” च्या पहिल्या सीजनच्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आय.आय.ए २०२१ चे प्रमुख निलेश आंबेडकर हे होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पा अवस्थी, नाशिक जिल्हा क्षयरोग डॉ. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या आरती प्रशांत हिरे, संस्थेच्या ट्रस्टी विमलताई बोढारे यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण, पोलीस दल, कला, उद्योग, साहित्या, धाडसी खेळ, पर्वतारोहन, मनोरंजन तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड २०२१” या पुरस्काराने गौरविण्यात आले, ब्ल्याक लेडी ट्रॉफी, सन्मानपत्र, गोल्डन मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्वाण फौंडेशनचे मुख्य समन्वयक राहुल सोनवणे, सचिन धारणकर,अविनाश जुमडे, राहुल कासार, तिलोत्तमा बाविस्कर, रोहिणी ठेंगे, निर्मिती सोनवणे, पलक गरुड आणि कोमल पगारे यांनी परिश्रम घेतले. सोनाली तुसे व सिद्धार्थ सपकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button