Nashik

महावितरण ने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे विनाशकाले विपरित बुध्दी —- योगेश बोडके —

महावितरण ने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे विनाशकाले विपरित बुध्दी
—- योगेश बोडके —

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
महावितरण शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय विनाशकाले विपरीत बुद्धि असा प्रकार होणार असून या प्रकाराबाबत नाशिकचे
जिल्हाधिकारी यांना आंदोलनात्मक ईशारा, येत्या काही दिवसात निवेदन देणार
राज्य शासनाने कृषी पंपाची वीज तोडणी बंद करावी नसता महाभकास आघाडी शासनाला शेतकरी माफ करणार नाहीत असा इशारा भाजपा ता उपाध्यक्ष यांनी दिला आहे.

राज्य शासनाच्या मनमानी व उदासिन धोरणाला राज्यातील शेतकरी वर्ग व जनता वैतागलेली आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून शेतीत अवकाळी पाऊस covid-19 वातावरणातला बदल बाजारभावाची चढ-उतार उत्पादनापेक्षा खर्च जास्त यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.अद्याप पीक विमा मिळालेला नाही तसेच मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्याची अद्याप नुकसान भरपाई किंवा वेळेवर केलेला पिक विमा शंभर टक्के ना होता दहा वीस टक्के तीस टक्के पर्यंत दाखवला जातो परंतु शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान असूनही त्याचा बेनिफिट शेतकऱ्याला मिळत नाही तसेच पिक विमा किंवा नुकसान भरपाई राज्य शासनाने बँक खात्यात जमा केलेली नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या संख्येने वाढत असताना शेतकरी वर्गाला राज्य शासनाने आधार देणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने राज्य शासनाच्या उर्जा विभागाने चक्क वीज बील थकबाकी मुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्या संदर्भातला शासन निर्णय काढून अकलेचे तारे तोडले आहेत.महाभकास आघाडी शासनाने वीज कनेक्शन तोडणी संदर्भात घेतलेला निर्णय म्हणजे विनाशकाले विपरित बुध्दी आहे. अशा मस्तवाल मनमानी करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा ता उपाध्यक्ष यांनी दिला आहे.

राज्य शासनाने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे बंद करावे यासाठी भारतीय जनता पार्टी आंदोलनात्मक इशाऱ्याचे निवेदन देण्यात येणार आहे
किसानों के सम्मान मै. भाजपा हमेशा मैदान मे.. असे योगेश बोडके यांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button