Amalner

श्रीमती भानुबेन शाह गोशाळेतर्फे जि प केंद्रशाळा ढेकू बु तांडा येथील गरीब गरजू मुलांना गणवेश, वाटरबॅग व चप्पल वाटप..

श्रीमती भानुबेन शाह गोशाळेतर्फे जि प केंद्रशाळा ढेकू बु तांडा ।. येथील गरीब गरजू मुलांना गणवेश, वाटरबॅग व चप्पल वाटप..

विनोद जाधव

श्रीमती भानुबेन शाह गोशाळेतर्फे ढेकू बु तांडा येथील जिल्हापरिषद केंद्रशाळेत सर्वच गरीब व गरजू मुलांना मोफत कपडे, वाटर बॅग वाटप करण्यात आले. यावेळी गोशाळेचे अध्यक्ष श्री. चेतनभाऊ शहा, प्रा. अशोक पवार, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. संदीप घोरपडे सर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. बसिलाल भागवत उपस्थित होते.तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. किरण जाधव , पोलीस पाटील देशमुख पवार .विकास सोसायटी सदस्य मोहन राठोड , ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव श्री. आनंदा राठोड , उत्तम राठोड, राजेंद्र जाधव, विठ्ठल राठोड स इत्यादी ग्रामस्थ तथा शिक्षणप्रेमी उपस्थित होते. गोशाळेतर्फे अनेक समाजोपयोगी कार्य नेहमीच पार पाडली जातात त्यांचे गावाकडून तसेच शाळेकडून विशेष कौतुक करण्यात आले तसेच गोशाळेचे यावेळी ग्रामस्थांनी आभार ही मानले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धीरज पाटील सर यांनी केले तर आभार श्री किरण बाविस्कर सर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button