Aurangabad

खासदार संभाजीराजेंचं काकासाहेब शिंदेंना अभिवादन..

खासदार संभाजीराजेंचं काकासाहेब शिंदेंना अभिवादन..

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना आज अभिवादन केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारनं दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली.

अशा कुटुंबातील एकाला लवकर नोकरीवर घ्या, अशी विनंती संभाजीराजे यांनी सरकारला केलीय. त्याचबरोबर मराठा आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याची मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केलीय. आता समाजाची भूमिका संपली. आता समाजाने नाही तर लोकप्रतिनिधिंनी जबाबदारी घेऊन रस्त्यावर उतरावं. सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. कोर्टाने ती फेटाळल्यास तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी, नंतर आरोग्य स्थापन होईल.

त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता असल्याचंही यावेळी संभाजीराजे म्हणाले. त्याचबरोबर ओबीसींच्या सवलती गरीब मराठा समाजाला मिळायला हव्या. आता 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करणार. त्यानंतर राज्यात लॉंग मार्च काढू, असा इशाराही संभाजीराजे यांनी यावेळी दिलाय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button