Aurangabad

केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर बोगस असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर बोगस असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : सध्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे, तरीदेखील व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासत आहे. या कारणास्तव खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने मराठवाड्याला पीएम केअर फंड मधुन १५० व्हेंटिलेटर मिळाले आहे मात्र त्यातील बरेचसे खराब आहेत. ज्या दवाखान्याला ते मिळाले त्यांच्या सांगण्यानुसार हे व्हेंटिलेटर अत्यंत सुमार दर्जाचे असून कोरोना रुग्णांसाठी ते उपयोगी पडतील अशी शक्यता कमीच आहे.
यामध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांकडुन आलेले व्हेंटिलेटर असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असे ट्विट खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button