गडचिरोली

खासदार अशोक नेते यांचा अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागात दौरा

खासदार अशोक नेते यांचा अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागात दौरा
शासनाकडून तत्काळ मदतीसाठी प्रयत्न करणार
नुकसान ग्रस्त शेतीची केली पाहणी

ज्ञानेश्वर जुमनाके

गडचिरोली तालुक्यातील जेप्रा, दिभना, अमिर्झा परिसरात अतिवृष्टी मुळे धान पिकांचे मोठे नुकसान झाले आज दि 8 नोव्हेंबर रोजी खासदार अशोक नेते यांनी सदर नुकसान ग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली व या परिसरातील शेतीचे सर्व्हेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना तहसीलदार व BDO व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ अनंत पोटे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या, तसेच मी स्वतः उद्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती देणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार अशोक नेते यांच्या दुष्काळ व अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या दौरा दरम्यान गडचिरोली चे तहसीलदार गणवीर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ पोटे, BDO मरसकोल्हे, जिल्हा महामंत्री डॉ भारत खटी, प्रशांत वाघरे, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, बंडूजी झाडे, जिप सदस्य निताताई साखरे, व या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी धान पिकांची पाहणी केली असता अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले खास अशोक नेते यांच्या समक्ष अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा सांगितली व पीक हातात यायची वेळ जवळ आली असतांना अचानकपणे झालेल्या अतिवृष्टी ने पिके पूर्णतः नष्ट झाली असून केलेला खर्च ही उतपादनातून मिळणार नसल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना खासदार अशोक नेते यांनी मी स्वतः लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Back to top button