चिमूर,चंद्रपूर

चिमूर तालूका कॉग्रेस कमिटीच्या वतिने उपविभागिय कार्यालयावर धरणे आंदोलन

चिमूर तालूका कॉग्रेस कमिटीच्या वतिने उपविभागिय कार्यालयावर धरणे आंदोलन

गुंडा गर्दी ने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – सतिश वारजूकर

चिमूर प्रतिनिधी,, ज्ञानेश्वर जुमनाके

शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या घेऊन आज सतीश वारजूकर व तालुका कांग्रेस कमिटी तर्फे उपविभागीय कार्यालय चिमूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांनी आपल्या ‘हाळाच्या काळ्या व रक्ताचे पाणी’ करून शेतात राबतात पण निसर्ग शेतकऱ्यावर कोपला असून,पाऊस जास्त प्रमाणात पडून ओला दुष्काळ या तालुक्यात झाला आहे या करिता

१)शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहिर करुन तात्काळ सरसकट आर्थिक मदत करावी.
२)धान, सोयाबीन, तूर, कापूस, या पिकांना हेक्टरी ५०,०००/- रू पर्यत आर्थिक मदत देण्यात यावी.
३) शेतकऱ्यांचे सरसकट पिक कर्ज माफ करून सात बारा कोरा करण्यात यावा.
४)शेतकऱ्याच्या कृषी पंपाची विज बिले बिनशर्त माफ करण्यात यावा.
५) शेतकऱ्यांना पिक विम्याचा तात्काळ लाभ देप्यात यावा.
आदी मागण्यासह आज काग्रेसने धरणे आंदोलन केले.

गटनेता तथा माजी जील्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करित असताना बोलले की, झालेल्या विधानसभा निवडनूकीत मि खूप प्रमाणात विरोधकांकडून गुंडागर्दी पाहली तर, मला अस वाटत की, आता दिलेल्या निवेदनातून जर, शासनाने या निवेदनावर प्रतीक्रिया केली नाही तर, येत्या १५ दिवसात आपण सूद्धा त्यांचेच अनूकरण करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार…

यावेळी संजय डोंगरे, विजय डावरे, विलास डांगे, शांताराम शेलवटकर, गोपाल झाडे, मनिष नंदेश्वर, संजय बूटके, भावना बावणकर,नाजेमा खान, नर्मदा रामटेके,लता पिसे आदि काग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button